भवन लिल्हारे उपसंपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो. नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यात ग्राम विकासातून लोककल्याण संकल्पनेवर आधारित विविध योजना आणि उपक्रम राबवित ग्रामोन्नती साधण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. दिव्यांगानाही स्वबळावर उभे राहता यावे यासाठी साहित्य वाटपाची योजना तेवढीच महत्त्वाकांक्षी असल्याचे व्यक्त खासदार सुनील मेंढे यांनी केले. तुमसर येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि एआयडीपी उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्त साधुन विविध समस्या घेऊन त्या सोडविल्या जातील या आशेने आलेल्या तालुक्यातील असंख्य नागरिकांचे आज समाधान केले. तुमसर तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित जनता दरबारात अनेक समस्या मांडल्या गेल्या. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या.


0 टिप्पण्या