Ticker

6/recent/ticker-posts

आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीपक्षातून बाहेर पडलोअसे एकही नेता का म्हणत नाही?


              संतोष पाटील 
----------------------------------------------------
लेख  -: देशातला सर्वात जुना व मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जातं, याच पक्षाचे नेते विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेता असतानाही ज्या पक्षानी आपल्याला मोठं केलं तो पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी सहज सोडून दिला व ते भारतीय जनता पार्टीत दाखल झाले, पक्ष सोडताना त्यांनी वेगवेगळे कारण दिली, *मात्र मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा पक्ष सोडत आहे असे म्हटले नाही* त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना नावाचा जहाल मतवादी पक्ष या पक्षातून एकनाथ शिंदे व सहकारी वेगवेगळी कारण सांगून पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात सामील झाले, कधी म्हणे आम्हाला अजितदादा निधी देत नाहीत, तर कधी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आम्हाला काही विचारत नाहीत, दुसरे कारण असे की आम्ही हिंदुत्वासाठी हा पक्ष सोडून भाजपात येत आहोत, मात्र या शिंदे गटातील फुटलेला एकही आमदार असे म्हणाला नाही *की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतःचा पक्ष सोडत आहे* त्याच्यानंतर आत्ताची ताजी गोष्ट शरद पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी नावाचा पक्ष तोही घरातल्याच माणसाने फोडला, हा पक्ष फोडणाऱ्या अजितदादांसोबत असणारे वयोवृद्ध आमदार या सर्वांनी आपली पक्षनिष्ठा एका क्षणात स्वार्थासाठी दूर ठेवून भाजपाच्या गोटात शिरले, *मात्र हेही आमदार असे म्हणाले नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतःचा पक्ष फोडून भाजपाच्या सोबत आलोय*
तर शेतकरी मित्रहो हाच खरा चिंतनाचा विषय आहे आणि हीच खरी विचार करण्याची वेळ आहे, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या अजेंडा वरून शेती व शेतकरी हा विषय काढून टाकला तेव्हाच खऱ्या अर्थान या देशातील महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ग्रहण लागलं, खरे म्हणजे 70 टक्के मतदान असणाऱ्या शेतकरी वर्गाचा हे राजकीय लोक का विचार करत नाहीत? या राजकीय लोकांची नोकरदार, व्यापारी, भांडवलदार, गुंड मवाली, यांच्यावरच जास्त मेहरबानी आहे मात्र या देशाचा खरा आधारस्तंभ देशाचा अन्नदाता बहुसंख्य असणारा मतदाता म्हणजे शेतकरी या शेतकऱ्याकडे यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे, याची अनेक अशी कारण सांगता येतील की शेतकऱ्याला राजकारणातलं काहीच कळत नाही, या कास्तकार समाजामध्ये एकोपा नाही किंवा याच्याही पुढे जाऊन विचार केला तर त्यांना असे वाटत असेल कदाचित या शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पोरांना काहीच कळत नाही, यांचा बाप झाडावर लटकला तरी ही पोरं आपल्या नेत्याचा झेंडा खांद्यावर मिरवत फिरतात व मिरवतीलच असा त्यांना प्रचंड आत्मविश्वास असल्याने ते शेती व शेतकऱ्यांना दुर्लक्षित करत आहेत, आणि यामागे तथ्यही आहे कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कोणीच लढायला तयार नाही एखादं जर शेतकऱ्यांचं उभारतं नेतृत्व तयार झालं तर त्याला अमिश दाखवून लगेच राजकीय पार्टीमध्ये भरती करण्यात येत, आणि तोही आपली चळवळ आपला बाप सारं विसरून राजकीय पार्टीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता होऊन जातो आणि मग ती चळवळ भरकटते आणि शेतकऱ्यांचाच शेतकऱ्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास उठून जातो, आणि ही विस्कळीत झालेली साखळी या राजकीय पार्टीला सहजपणे जुळून जाते, सध्या महाराष्ट्रात अतिशय किळसवाणा प्रकार चालू आहे कोण काय करतोय हेच कळत नाही आपला पक्ष, आपली विचारधारा, एकनिष्ठता, एक वाक्यता, या गोष्टींना कुठेच थारा राहिलेला नाही निव्वळ सत्तेसाठी घोडेबाजार सुरू आहे आणि ह्या घोडेबाजाराला अविचारी गाढवाचं कारणीभूत आहेत हे सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी बिकट परिस्थिती सुरू आहे ती अतिशय जीवघेणी आहे मागच्या वर्षाचं पिकलेलं पीक विकता आलं नाही विकलं तर हातात काहीच पडलं नाही, आणि आता ह्या चालू वर्षी प्रचंड दुष्काळाचा सावट आहे आधीच पेरणीला उशीर झालेला त्यात पाऊस पडत नाही शेती प्रचंड तोट्यात गेलेली आहे राज्याचं कृषी मंत्रालय दोनचार कागदावरच्या योजना सोडल्या तर शेतकऱ्यांसाठी भरीव असं काहीच करत नाही, शेती ही माणसं जगवण्याचं साधन आहे हेच हे लोक विसरून गेलेले आहेत, आपल्याला भ्रष्टाचार करून कुठे कमावता येईल यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा ओतून योजना आखल्या जातात व त्या कागदावरच्या कागदावर कार्यान्वित करून जनतेचा अमाप पैसा स्वतःच्या घशात घातला जातोय, तरी हे सगळं आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना कळत नाही हेच मोठे दुर्दैव आहे......
                         
     
संतोष पाटील..
8999859021/wat.9975241792..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या