शिर्डी :- राज्य शासनाने पत्रकारांसाठी राज्य अधिस्वीकृती समिती गठीत केली असून या समितीवर दैनिक दिव्य मराठीचे शिर्डी ब्युरो चिफ नवनाथ दिघे निवड झाली आहे. नाशिक विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानोबा इगवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने शिर्डी माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीवर यापूर्वी नवनाथ दिघे यांनी काम केले आहे. शासनाने नव्याने गठीत केलेल्या समितीत शासन नामनिर्देशीत कोट्यातून नवनाथ दिघे यांना राज्य पातळीवरील राज्य अधिस्वीकृती समितीत संधी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास, पंचायतराज आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी श्री.दिघे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या