Ticker

6/recent/ticker-posts

मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश भाऊ हटवार यांनी घेतले पुढाकार

मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथील २ महिने २० दिवसाच्या चिमुकलीवर हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

 सव्वालाखे कुटूबियांनी मा. आमदार नानाभाऊ पटोले व सहायता कक्षाचे आरोग्य दुत आनंद नागोसे यांचे मानले आभार
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मौजा मांडेसर येथील रहिवासी असलेल्या अंबर सव्वालाखे यांच्या मुलीला जन्मतः हृदयास छिद्र असल्याने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते, डॉक्टरांनी बाळाला हृदयाचा विकार आहे म्हटलं की सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकतो. आता पुढे काय? कशामुळे असं झालं असेल? पुढची कोणती तपासणी? ऑपरेशन करावं लागणार का? तेही इतक्या तान्ह्युल्या बाळाला सोसेल का? दुसरा काही पर्याय नाही का? वैगेरे अनंत प्रश्न डोळ्यासमोर येतात. या शस्त्रक्रिया साठी बराच पैसा खर्च करावा लागतो. बाळाच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने हृदय शस्त्रक्रिया करने शक्य नव्हते. जन्माला आलेला बाळ हा मात्र २ महिना २० दिवसाचे होते. आणि वडील आपल्या कुटूंबियाचे पोट पालण्याकरीता ३०० रुपये रोजीने पेंन्टीग च्या कामावर जात होते.
अश्या गंभीर परिस्थितीत मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश हटवार आणि धर्मराज तीवडे यांना मा. प्रकाश नागपूरे व पिडीतेचा मोठा भाऊ सुशिल सव्वालाखे यांनी परिवाराची संपूर्ण गरिब परिस्थिती समजाऊन सांगितली. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार मा.राजेशभाऊ हटवार (अध्यक्ष मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी ) यांनी समझले. व समोर पुढाकार घेतले. व मा. नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाकडे मदत मागितली, या छोट्याश्या चिमुकलीचे दुःख समजून घेऊन , व सव्वालाखे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती ही मजबुत नसल्याने त्यांचे दुःख जानुन घेऊन , नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाचे आरोग्य दूत आनंद नागोसे यांना कळवीले. व त्यांनी त्वरित वर्धा येथील एका हॉस्पिटल मध्ये दाखल केले, ती लहानशी चिमुकली मात्र २ महिने २० दिवसाची होती. त्या चिमुकलीवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदय शस्त्रक्रिया सफल झाल्याने सव्वालाखे कुटुंबीयांनी मा.आमदार नानाभाऊ पटोले आणि नानाभाऊ पटोले रुग्ण साहयता कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत आनंद नागोसे, व जिवदान देणारे डॉक्टर यांच्या सहकार्याचे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या