रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
औरंगाबाद - दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हयाची मासिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष पद जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी भूषवले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद जिल्हा प्रभारी तथा वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव अरुंधतीताई शिरसाट (अकोला )उपस्थित होत्या.
या बैठकीत त्यांनी उपस्थित सर्व जिल्हा पदाधीकारी यांचे पक्ष कार्याचा आढावा घेतला. औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यातील सर्व तालुके, जसे खुलताबाद,कन्नड,वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम तालुका, येथील सर्कल गट, गण बांधणी त्यांच्या कार्यकारण्या आणि येथील संभाव्य उमेदवारांची यादी याविषयी येथील निरीक्षकांकडून माहिती घेतली. तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी तालुक्यातून जिल्हा पदाधीकारी यांना बोलवल्या जात नाही ही तक्रार असू शकत नाही असा त्यांनी सज्जड दम दिला. जिल्ह्याची मिटिंग मध्ये वेळेवर यावे आणि परवानगीशिवाय सभा त्याग करू नये असे सांगितले.
पक्षात चळवळ, संघटन, अधिकार या शिवाय उमेदवार निवड करतांना तो लोकांभिमुख असावा. राजकारण पैशाशिवाय शक्य नाही असे मार्गदर्शन केले.यावेळी पक्षांमध्ये पूनम भीमराव राठोड, विशाल विजय कोळसे, संदीप भाऊराव मोटे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला सर्वांचे स्वागत अरुंधतीताई सिरसाट यांनी केले.
शेवटी अध्यक्षीय भाषण झाले. या बैठकीला जिल्हा महासचिव श्याम भारसाकळे, मिलिंद बोर्डे, ऍड. पंकज बनसोडे, संघराज धम्मकीर्ती,औरंगाबाद पश्चिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे,अकोला शहर अध्यक्षा इंगळे ताई,जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, सचिव लक्ष्मण धनेश्वर,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, संपर्क प्रमुख गणेश खोतकर,बाबा पटेल, प्रा. अब्दुल समद, सिद्धार्थ बनकर,अशोक खिल्लारे,प्रवीण जाधव ,बाबासाहेब वक्ते,पी के दाभाडे,रविरत्न पारखे आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या