🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १५ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २४ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : कृष्ण
तिथी : चतुर्दशी (१२.४०) ~ अमावास्या
वार : मंगळवार
नक्षत्र : पुष्य (१४.००) ~ आश्लेषा
राशी : कर्क
*दर्श अमावास्या* (प्रारंभ दुपारी १२.४०)
*अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिन*
पतेती
*महर्षि योगी अरविंद जयंती*
१६६४: कुडाळ प्रांतात शिवाजी महाराजांनी खवासखानाला (दुसर्यांदा) पराभूत केले.
१८२४: अमेरिकेतील गुलामगिरी मधून सुटका झालेल्या लोकांनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना
१९१४: पनामा कालव्यातुन एस. एस. अॅनकॉन हे पहिले व्यापारी जहाज पार झाले.
१९२९: ग्राफ झेपेलिन हा संशोधक ’झेपेलिन’ बलूनमधून जगप्रवासासाठी रवाना
१९४५: दुसरे महायुद्ध – जपानने शरणागती पत्करली.
१९४७: ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध,बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४७: पाकिस्तानचे निर्माते मुहम्मद अली जिना यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कराची येथे शपथविधी झाला.
१९४८: दक्षिण कोरियाची निर्मिती झाली.
१९७१: अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९७५: बांगलादेशमध्ये लष्करी उठाव. शेख मुजीबूर रहमान कुटुंबीयांची हत्या.
१९८२: भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली.
१९८८: मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत, दूरदर्शनवरून प्रथम प्रसारित झाले.
जन्मदिवस:
१७६९: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक.
१७९८: भारतीय योद्धा संगोली रायन्ना.
१८६५: रेकीचे निर्माते मिकाओ उस्ईई
१८६७: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या
१८७२: क्रांतिकारक, तत्त्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म.
१८७३: भारतीय पुरातात्त्विक व इतिहासकार रामप्रसाद चंदा
१९१३: लेखक व कवी भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ बी. रघुनाथ तथा फुलारी.
१९१५: ऊर्दू कथा, पटकथा लेखिका इस्मत चुगताई.
१९१७: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
१९२२: लोककवी वामनदादा कर्डक
१९२९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
१९४५: बांगला देशच्या पंतप्रधान बेगम खालेदा झिया.
१९४७: चित्रपट अभिनेत्री राखी
१९५८: अभिनेत्री आणि वेशभूषाकार सिंपल कपाडिया
१९६४: बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या सह-संस्थापिका आणि बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स
१९७१: भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामी
१९९२: भारतीय बुद्धिबळपटू भास्करन आडहान
मृत्यूदिन:
१९४२: स्वातंत्र्य सेनानी, म. गांधींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई
१९७४: स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली
१९७५: बांगला देशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादात हत्या केली.
२००४: अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
*।। दास-वाणी ।।*
दिसते ते सांगतां न ये ।
बळे भावार्थ धरितां नये ।
साधक कासाविस होये ।
अंतर्यामीं ।।
सांगोपांग घडे ध्यान ।
त्यास साक्ष आपुलें मन ।
मनामध्यें विकल्पदर्शन ।
होऊंच नये ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०८/३४-३५
देवाच्या ध्यानासाठी एकदा आसन मांडून डोळे मिटून बसल्यावर समोर काय काय दिसते ते खरोखर कोणाला सांगायची सोय नाही. लोकांत फजितीच होईल. बरं बळजबरीने मिटलेल्या डोळयांपुढे भगवंताचे सगुण रूपही जेमतेम येते. तिथे निर्गुण निराकाराचे अनुसंधान फारच दूरची गोष्ट. अशा वेळी साधकाचा मात्र कोंडमारा होऊन तो कासावीस होतो.
खरोखर भगवंताचे सांगोपांग ध्यान घडते की नाही हे फक्त त्या साधकाच्या मनालाच उमगते. त्यामुळे ध्यानावस्थेत असताना मनामधे एकही विकल्प म्हणजे परब्रह्माशिवाय दुसरा विचार येऊ न देणे उत्तम. हेच यशस्वी अखंडध्यान होय.
अखंडध्याननिरूपण समास.
🇮🇳 *भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन!* 🇮🇳
*॥भारतमाता की जय॥*
*॥वंदे मातरम् ॥*
🙏 💐💐💐💐 💐 🙏
0 टिप्पण्या