पैठण तालुका,लोहगाव सर्कल प्रतिनिधी विजय केदारे.
मो.९९२३१६७४९७,
पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हण येथील दि.१४/८/२०२३ वार सोमवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नदीकाठीवस्ती ब्रम्हगव्हाण. येथे ग्रुप ग्रामपंचायत मावसगव्हाणचे ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक एन. डी. पाडळे व ग्रामपंचायत कार्यालयाचे व्ही. डी. केदारे सर यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेला भेट,
शाळेच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा शॉल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचा परिसर, विद्यार्थ्यांचे गुणवत्ता पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले, विविध उपक्रमाची माहिती घेतली, विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून आनंद व्यक्त केला आणि काही विद्यार्थ्यांना रोख बक्षिसही दिले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दोन हजार रुपयांच्या रोख बक्षीस दिले.
यावेळी ब्रह्मगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक सहकारी सोसायटी चे संचालक कैलास मिसाळ सर,यांनी शाळेविषयी सखोल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी साहेब यांना दिली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही केले. पाडळे साहेबांनी शाळेसाठी लवकरच अवघ्या दोन दिवसांमध्ये रंगोटीचे काम प्रत्यक्ष स्वरूपात सुरू करण्याचा आश्वासन दिले. व शाळेसाठी विद्युतीकरण करण्यासाठी शाळेला ग्रामपंचायत मार्फत सोलर पॅनलचे बसवले जाईल असा शब्दही दिला.यावेळी ब्रह्मगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक सहकारी सोसायटी चे संचालक कैलास मिसाळ सर, नदीकाठवस्ती शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत दराडे सर, शाळेचे सहशिक्षक रवि केदारे सर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या