Ticker

6/recent/ticker-posts

भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव अग्रेसर - फारुख अहमद


पारंपरिक कला साजरी करून भटके विमुक्त स्वतंत्र दिन थाटात साजरा करण्यात आला.

चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही भटक्या विमुक्तांच्या जीवनात स्वातंत्र्याचा किरण पोहचला नसून आणखीही हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. या समाजाच्या अन्न,वस्त्र निवारा या मूलभूत गरजा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. ह्या समस्या सोडविण्यासाठी व या समाजाच्या न्याय, हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार  ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वंचित बहुजन आघाडी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी केले आहे.

31 ऑगस्ट 1952 रोजी देशातील भटके विमुक्त यांच्यावर इंग्रजांनी लादलेला गुन्हेगारी जमात नावाचा जाचक कायदा भारतीय संविधानाने मागे घेण्यात आला. हा दिवस भटके विमुक्त स्वातंत्र दिवस म्हणुन साजरा केला जातो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेवरून राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा दिवस भटके विमुक्त यांच्या पालावर जाऊन, त्यांची सुख दुःख , त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियोजन करावे यासाठी भटक्या विमुक्त यांचे मेळावे घेण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून आज नांदेड दक्षीण तालुक्यातील जवाहर नगर येथे भटक्या विमुक्त समजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना फारुख अहमद पुढे म्हणाले की, देशातील व राज्यातील भटके विमुक्त समाजात शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी वंचीतच्या वतीने प्रयत्न केले जातील.  या समजाच्या निवाऱ्यासाठी त्याना हककाचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आरोग्याच्या व महिलांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी काम केले जाईल. त्याचबरोबर या समजावर होणारे हल्ले, व  खोट्या तक्रारी व दाखल करण्यात आलेले गुन्हे यासाठी देखील प्राधान्याने कार्यक्रम हाती घेतला जाईल. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भटके विमुक्तांच्या नेते देविदास हदवे यांनी केले. यावेळी   मुस्लिम इदाहत फ्रंटचे जावेद कुरेशी  (औरंगाबाद), वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव श्याम कांबळे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रवी पंडित, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर,  भटके विमुक्त समाजाचे नेते नागनाथ वाकोडे  (औराद बिदर,)आदी प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत साहेबराव भंडारे, प्रा. नंदकुमार गच्चे,डॉ सिद्धार्थ भेदे, पंकज डोईबोळे,संतोष महाजन, राजू शिंदे परभणी, राजू भांडे नांदेड, बापुनाथ शिंदे, भाऊराव शिंदे, सचिन भांडे, अमृता भिसे, गंगाधर कोळी, सुशीलाबाई मांडवकर मूर्तिजापूर अकोला यांच्या सह पंकज डोईबोळे, सुक्लोधन गायकवाड, नजीर खान, खय्युम शेख,इत्यादीचीही उपस्थिती होती. या मेळाव्यात पारंपरिक कला साजरी करून भटके विमुक्त स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या