• ५ वेळा रक्तदान करून दिला मानवतेचा परिचय
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान" आहे. रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचविता येते. या उदात्त भावनेने लाखनीच्या पोलिस निरीक्षकांनी समाजाप्रती कृतज्ञता बाळगत पाच वेळा रक्तदान केले असून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. मिलिंद तायडे असे त्यांचे नाव असून समाजसेवेसाठी ते नेहमी तत्पर असतात समाजात कोणावरही अन्याय होत असेल तर त्याला कशी मदत करता येईल या उदात्त भावनेने ते जीवन यापण करीत असल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
एप्रिल २०२२ मध्ये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी लाखनी पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांनी अनेक समाजसेवेचे कार्य केले आहे. अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या व्यवसायिकांना धंद्याचे उच्चाटन करून समाजात मानाचे स्थान मिळावे. तथा उदरनिर्वाह व्हावा या करिता व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. ही प्रेरणा त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडून घेतली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी रक्तदान केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुसऱ्यांदा रक्तदान केले. यापूर्वीही त्यांनी तीन वेळा रक्तदान केले असून एकंदरीत पाच वेळा रक्तदान करून त्यांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे...". हे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यावर त्यांचा भर असल्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश मिळवून अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी प्राधान्य देतात. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीचे समुपदेशन करून अमली पदार्थापासून परावृत्त केले. रक्तदानासोबतच आपण काही समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेने अनाथ मुलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला आहे. तळागाळातील लोकांना ते नेहमीच मदत करीत असतात या शिवाय त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केल्यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. इतरांनीही पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचेकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात योगदान देणे गरजेचे झाले आहे.


0 टिप्पण्या