मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद : (धाराशिव ) दि 14/10/2023 रोजी,14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिना-निमित्त उस्मानाबाद शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती (अस्थि) पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ठिक 10.00 दहा वाजता करण्यात आले होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी सामूहिक त्रिसरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेण्यात घेतली.तसेच उपस्थित सर्व बौद्ध उपासकांना,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे स्मरण व्हावे म्हणून जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष
विजया अशोक बनसोडे यांनी दृदपणे 22 प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करून घेतले आणि शेवटी प्रचंड अशा घोषणाच्या निनादामध्ये डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाcha जय-जयकार करून उपस्थितांना मिठाई वाटप करून अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद बाबासाहेब जानराव,प्राचार्य. सुरज ननावरे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विद्यानंद वाघमारे,ता.संस्कार उपाध्यक्ष डॉ. दिनकर झेंडे,ता.पर्यटन सचिव धनंजय वाघमारे,कार्यालयीन सचिव महादेव एडके,सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंगाडे,आर.पी.आय चे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड,बापू कुचेकर,डॉ.रमेश कांबळे,ओव्हाळ साहेब,सुनिल वाघमारे,बलभीम वाघमारे,बाबासाहेब घरबुडवे तालुका कोषाध्यक्ष शिवाजी गायकवाड,सिद्राम वाघमारे,सागर गायकवाड,रोहित गायकवाड,दुष्यंत बनसोडे,निखिल बनसोडे,प्रभाकर सोनवणे,राजाभाऊ बनसोडे,आर.टी गायकवाड,अर्जुन ओव्हाळ,नागसेन बनसोडे,सौ.भिमाई विजय बनसोडे,कुशीनारा बनसोडे
यांच्यासह अनेक बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या