Ticker

6/recent/ticker-posts

धम्माचा प्रचार व प्रसार हेप्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्यच !!


माजी आमदार दिलीप
बनसोड यांचे प्रतिपादन

महाप्रज्ञा बुद्ध विहारात
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा


प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558.

गोंदिया : धम्म हे व्यक्ती केंद्रित आहे. व्यक्तींचे व्यक्तींशी व समाजाची नाते कसे असावे, हे धम्म शिकविते. धम्म हे प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देते.  पंचशील हा धम्माच्या गाभा असून मानवी कल्याणासाठी धम्माचा प्रचार व प्रसार हे प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी आमदार आयु. दिलीप बनसोड यांनी केले आहे.

महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे आज (ता. १४)धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष आयु. अतुल गजभिये होते. यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष आयु. टी. एम. वैद्य,  सचिव आयु. तेजराम मेश्राम, कोषाध्यक्ष आयु. आर. बी. नंदागवळी, माजी नगरसेवक तथा समितीचे सल्लागार आयु. विजय बनसोड, सामाजिक कार्यकर्ते आयु. अजय वैद्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे सचिव आयु. सुरेश बनसोड, विहार समितीचे सदस्य आयु. लारेंद्र गेडाम, आयुष्मती सुजाता जनबंधु, आयुष्मती कल्पना मेश्राम, आयुष्मती राजश्रीताई दहिवले, सोशियल बुद्धिस्ट युथ फोरमचे संचालक आयु. सुधीर मेश्राम, उपाध्यक्ष आयु. लंकेश टेंभेकर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयु. देवानंद शहारे, सचिव आयु. राजविलास बोरकर, ॲड. आयु. नरेश शेंडे, आयु. साजन रामटेके, आयु. जगदीश बनसोड, आयु. संजय शामकुवर, आयु. मनोज वासनिक, आयु. राजकमल मेश्राम, यावेळी उपस्थित होते. आयु.  दिलीप बन्सोड पुढे म्हणाले की, धम्मदीक्षेनंतर समाज प्रगतीपथावर गेला.  त्यामुळे सामाजिक भान ठेवून होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन व मदतीवर त्यांनी भर दिला. संविधानाच्या संरक्षणासाठी आता पुढे येऊन लढा देण्यावर ही त्यांनी आपले मत व्यक्त केले.  विहार समितीचे अध्यक्ष आयु. अतुल गजभिये यांनी उपस्थितांना बावीस प्रतिज्ञा देवून समयोचित विचार व्यक्त केले. आयु. अजय वैद्य यांनी एका गरीब विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान मुख्य विहारात बुद्ध वंदना, बावीस प्रतिज्ञांचे वाचन आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आयु. लंकेश टेंभेकर यांच्याकडून समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र भेट देण्यात आले. तर प्रा.आयु. लेखानंद राऊत आणि कुटुंबीयांकडून विहारात खीरदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विहार समितीचे उपाध्यक्ष आयु. टी. एम. वैद्य यांनी केले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाप्रज्ञा बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.
----
विजयादशमीला संविधान सन्मान समारोह

संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार बहाल केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण तथा अधिकार भारतीय संविधान देते. मात्र संविधानातुन मिळणाऱ्या मौलिक अधिकाऱ्यांवर गदा आणण्याचे कार्य सातत्याने होत आहेत. संविधानाच्या सन्मान करण्यासाठी तिरोडा शहरात विजयादशमीच्या दिवशी संविधान सन्मान समारंभाची घोषणा माजी आमदार दिलीप बनसोड यांनी केली. कार्यक्रमानिमित्त संविधानाच्या प्रति भेट देण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या