Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १८ ऑक्टोबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २६ आश्विन १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास :  आश्विन  
पक्ष :  शुक्ल 
तिथी : चतुर्थी (२५.१०) ~ पंचमी 
वार: बुधवार
नक्षत्र : अनुराधा (२१.००) ~ ज्येष्ठा 
राशी : वृश्चिक 

*विनायक चतुर्थी*
*तुला संक्रांत* पर्व काळ सूर्योदय ते दु. १२.२५ पर्यंत 

जागतिक रजोनिवृत्ती दिन

२००२: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
१९७७: २०६०-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.
१९७२: प्रथम बहुउद्देशीय हेलिकॉप्टर एस. ए. 315  ची चाचणी बंगलोर येथे घेण्यात आली.
१९६७:सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९५४: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
१९२२:ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना
१९१९:राम गणेश गडकरी लिखित ’संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ’बळवंत संगीत नाटक मंडळी’ने केला.
१९०६:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ’डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली.
१८७९:थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना
१८६७:सोविएत रशियाला ७२ लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.

जन्मदिवस :
१९७७: भारतीय अभिनेता कुणाल कपूर.
१९५६:मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू 
१९५०:ओम पुरी – अभिनेता
१८६१:’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. 
१८०४:मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) - थायलंडचा राजा 

मृत्यूदिन :
२००४: वीरप्पन – चंदन तस्कर 
१९९६: क्रांतिकारक रामकृष्ण खत्री.
१९९३:मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री. दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत. 
१९८३: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू.
१९७६: भारतीय कवी आणि लेखक विश्वनाथ सत्यनारायण.
१९८७:वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते. कार्ल मार्क्सच्या ’दास कापिटाल’ या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. 
१९५१:हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार 
१९३१:थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक 
१९०९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. 

*।। दास-वाणी ।।* 

उत्तम गुणांची मंडळी । 
सत्वधीर सत्वागळी । 
नित्य सुखाची नव्हाळी । 
जेथे वसे  ।। 

विद्यापात्रें कळापात्रें । 
विशेष गुणांची सत्पात्रें । 
भगवंताची प्रीतिपात्रें । 
मिळालीं जेथें  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०१/०८/२२-२३ 

माझ्या या सभेला उपस्थित श्रोतेजन हे उत्तमगुणांनी संपन्न आहेत. ते सत्वगुणी आहेतच. धैर्यशीलही आहेत. नित्यनूतन आत्मसुखाने ते युक्त असल्याने भौतिक सुखविलासांची त्यांना यत्किंचितही ओढ नसते.

असे विद्यावान, कलागुणांनी संपन्न श्रोतेच भगवंताच्या प्रेमाला पात्र असतात. माझ्या सभेमधे असे 
बहुआयामी श्रोते मला लाभले हे मी माझे परमभाग्य समजतो आणि या अध्यात्मिक विद्वान श्रोतृवर्गाच्या सभेला मी मन:पूर्वक वंदन करतो.

सभास्तवन समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या