Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १५ ऑक्टोबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २३ आश्विन १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास :  आश्विन  
पक्ष :  शुक्ल 
तिथी : प्रतिपदा (२४.३०) ~ द्वितीया             
वार :    रविवार
नक्षत्र :   चित्रा  (१८.१०) ~ स्वाती                                        
राशी :    तुला 

मातामह श्राद्ध
*आश्विन मासारंभ*
*शरद ऋतू प्रारंभ*
*शारदीय नवरात्रारंभ*
*घटस्थापना* 
*रेणुकामाता नवरात्रोत्सवारंभ* - माहूर

*संत मुक्ताबाई जयंती* 
*संत बहिणाबाई पुण्यतिथी* 
*श्री महाराजा अग्रसेन जयंती*

*अब्दुल कलाम जन्मदिन* 
*वाचन प्रेरणा दिन*
*जागतिक अंध दिन*
जागतिक विद्यार्थी दिन 
जागतिक हस्त प्रक्षालन दिन

१८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
१८८८:गोपाळ गणेश आगरकरांच्या ’सुधारक’ पत्राची सुरूवात
१९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून  मृत्युदंड देण्यात आला.
१९३५:टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. या कंपनीचे राष्ट्रीयीकरण होऊन ’एअर इंडिया’ अस्तित्त्वात आली. 
१९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
१९८८: उज्ज्वला पाटील ह्या संपूर्ण जगाची समुद्र यात्रा करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९९९: जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान

जन्मदिवस :
१८९६: स्वातंत्र्यसैनिक, पहिल्या लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास
१९२६:नारायण गंगाराम सुर्वे – कवी 
१९३१:अबुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम – वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती, एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, पद्मभूषण (१९८१), पद्मविभूषण (१९९०), भारतरत्‍न (१९९७). राष्ट्रपती होण्यापुर्वी ’भारतरत्‍न’ हा भारताचा सर्वोच्‍च नागरी सन्मान मिळालेले ते भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) आणि डॉ. झाकिर हुसेन (१९६३) या भारतरत्‍न मिळालेल्या व्यक्ति पुढे राष्ट्रपती झाल्या.
१९३४: एन. रामाणी – कर्नाटिक शैलीचे बासरीवादक
१९५२: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व छत्तीसगड राज्याचे पूर्व मुख्यमंत्री रमण सिंह 
१९५७: मीरा नायर – भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका
१९६९: पं. संजीव अभ्यंकर – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

मृत्यूदिन :
१७८९:रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे – उत्तर पेशवाईतील प्रामाणिक, निष्पक्षपाती, निर्भीड आणि प्रसिद्ध न्यायाधीश, पुणे दरबारात १७५१ मधे त्यांची शास्त्री म्हणून नेमणूक झाली होती. थोरले माधवराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा रामशास्त्री सरन्यायाधीश होते. 
१९१८: शिर्डीचे साई बाबा 
१९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले.
१९६१:सूर्यकांत त्रिपाठी ’निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ’सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते. 
१९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान.
२००२: प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार.
२००२:वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार.
२०१२: कंबोडियाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक (नरोत्तम सिंहनौक)

*।। दास-वाणी ।।*

आता उपमावा गभस्ती । 
तरी गभस्तीचा प्रकाश किती ।? ?  
शास्त्रे मर्यादा बोलती । 
सद् गुरू अमर्याद  ।। 

म्हणौनि उपमे उणा दिनकर । 
सद् गुरू ज्ञानप्रकाश थोर । 
आता उपमावा फणीवर । 
तरी तोही भारवाही  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०१/०४/२१-२२ भाभाभा

सद् गुरूंचे वर्णन शब्दांमधे करता येत नाही. कारण शब्द मायेमधे येतात. आणि सद् गुरू ब्रह्मस्वरूप असतात. श्रीगुरूंची तुलना कशाशीही करता येत नाही, कारण प्रत्येक भौतिक गोष्टीमधे काही ना काही खोट आहेच. सद्गुरूना सूर्याची उपमा द्यावी म्हटले तर सूर्यप्रकाशालाही शास्त्रांमधे मर्यादा सांगितली आहे. सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश हा अमर्याद आहे. ते स्वत: सर्वप्रकाशक आणि नित्यप्रकाशमान आहेत.

म्हणून श्रीगुरू या ज्ञानसूर्याची, दिवसाच ठराविक जागी प्रकाश देणाऱ्या दिनकराशी तूलना होऊ शकत नाही. श्रीगुरूंना फणीवर म्हणजे पृथ्वीचा भार तोलणाऱ्या शेषाची उपमा तर अयोग्यच ठरेल कारण तो तर शंभर फण्यांचा सेवकच आहे. तात्पर्य श्रीगुरू हे एकमेव अद्वितीय अतुलनीय चिरंतन प्रकाशक तत्व आहे. अशा या गुरूतत्वाला माझे ग्रंथारंभीच वंदन.

सद् गुरूस्तवन समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या