गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128467
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील लोहगाव येथील शेतकर्याने नापीक पिकाला कंटाळून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार पैठण तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी मच्छिंद्र सिताराम लेंडे (वय ४३ वर्ष) रा.लोहगाव यांनी नापीक पिकाला कंटाळून व एका खाजगी बँकेचे कर्ज बाजारी झाल्याने त्यांनी स्वत:च्या विहिरीमध्ये दि.१६/१०/२०२३ वार सोमवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास विहिरीत उडी मारुन आत्महात्या केली आहे. दि.१७/१०/२०२३ मंगळवार रोजी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान मच्छिंद्र लेंडे यांच्या मुलाने व सुनाने मृत अवस्थेत प्रेत विहिरीबाहेर काढून पुढील तपासणीसाठी बिडकीन येथिल शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. आशिष वेद पाठक यांनी तपासुन मृत घोषित केले.डाॅ.वेदपाठक यांनी शेवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेची माहिती मयत यांचा मुलगा अजय मच्छिंद्र लेंडे व नितिन सिताराम लेंडे यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात येवुन माहिती दिली.या माहितीवरुन पोलीस उपनिरिक्षक अशोक माने व सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे यांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला.वरिल घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अशोक माने व सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे पुढील तपास करत आहे.
0 टिप्पण्या