गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
शासनाने महिला सबलीकरणासाठी आणि जेष्ठ नागरिकासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत मात्र आजही ग्रामीण भागात हजारो वृद्ध हालअपेष्टांचे जीवन जगत आहेत,मात्र सरकार या कडे लक्ष घालण्यात उदासीन आहे.
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील एका ७५ वर्षीय वृद्ध आजी व तीच्या विधवा मुलीची ही करुण कहाणी आहे.
ह्या आजी आपल्या पतीच्या निधनानंतर गोधडी शिवून आपला उदरनिर्वाह करत असत,मात्र आता गोधड्या चा जमाना कालबाह्य झाला असून त्याची जागा गाद्या गिरद्यांनी घेतली आहे काळानुसार बदललेली परिस्थिती व त्यातच आजीचं झालेलं वय आणि उपासमारीने खंगत चाललेलं शरीर त्यामुळे शासन दरबारी खेट्यामारुन शासकीय आर्थिक मदत पदरात पाडून घेण्यास ह्या आजी असमर्थ ठरल्या आहेत.
पैठण तालुक्यातील ७४जळगाव येथे एका चार पत्राच्या पडक्या खोलीत तुटपुंज्या रक्कमेत गोधाड्या शिलाई काम करुन आपले आपला उदरनिर्वाह करणाऱ्या दगडाबाई शेख या आजीबाईची दुर्दैवाने मोठी थट्टाच केली असे म्हणवे लागेल.
त्याचे कारणही तसेच आहे,आजीला जमिन जूमला आर्थिक पाठबळ मिळेल असा कुठलाही स्त्रोत नाही,सोबतीला एक विधवा मुलगी आहे त्या मुलीला देखील अपत्य अथवा कोन्हाचा सहारा नाही, तसेच एक मुलगा देखील आहे तो कायम आजाराने त्रस्त असल्याने तो देखील परागंदा जीवन जगत आहे त्यामुळे मुलगा असूनही तो केवळ नावापुरताच आहे,
गाव परीसरातील लोकप्रतिनिधी नेते मंडळी ,शासकीय कर्मचारी पदाधिकारी नेते जसे की ग्रामसेक, सरपंच तलाठी यांच्याकडून कुठलेही शासकीय निमशासकीय मदत यांच्या माध्यमातून अद्याप मिळत नसल्याने पोटापाण्यासाठी मोठ्या कठीण यातनातून या दोघी मायलेकी जीवन संघर्ष करतांना दिसून येते आहे.
वास्तविक पाहता अशा निराधार,विधवा माय लेकींना शासनाच्या विधवा तसेच निराधार पेंशन योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे, यासाठी नेतेमंडळी, शासकीय कर्मचारी तसेच सेवाभावी संस्थेने अथवा दानशुर दात्याने या आजीला घरपोच मदतीचा हात पुढे केला तर निश्चितच पुढील आयुष्यात उपासमारीची वेळ न येता यांचे आयुष्य थोडेफार सुखात जाईल अशी आशा करुया...
0 टिप्पण्या