इस्लाम धर्म विरूध्द आक्षेपार्ह पोष्ट शेअर केल्या प्रकरणी पैठणकरांची कारवाई ची मागणी
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,
औरंगाबाद :- गणराज नाईक पाटील याने दि.५/१०/२०२३ रोजी त्याच्या फेसबुकवर व्हाट्सअप अकाउंट वर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी समस्थ समाजबांधव तर्फे पैठण पोलीस निरीक्षक ला निवेदन देण्यात आले.प्रेषित पैगंबर मुहम्मद सहाब व त्यांचे पत्नी व मुली बाबत खूप अश्लील व अर्वाच्य मजकूर टाकून मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहेत तसेच शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचे काम त्याने केले आहे त्याची सदरील पोस्ट सर्व परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने संबंधित विषयात प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करून दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करावे व या षडयंत्र मागचे जे काही कट रचणारे आहे त्यांना शोधून त्यांच्याविरुद्धही कायदा सुव्यवस्थेचा बीघडवल्या व दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवून गुन्हे दाखल करावे असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन कर्ते मुफ्ती रज्जाक साहाब यांनी पैठण तालुक्यातील सर्व समाजबांधवांना उद्देशून सांगितले की,आज या धर्म विरोधात षडयंत्र केले उद्या ईतर धर्म विरोधात षडयंत्र करतील हे कुठपर्यंत चालू द्यायचे हे कुठेतरी थांबाले पाहिजे.आज जसे तुम्ही सर्वधर्मांचे समाज बांधव एकत्रितपणे येथे आलात त्याच पध्दतीने प्रेत्येक वेळी एकमेकांना आपसात सुख दुःखात,व अशा उद्भवलेल्या अडचणींत मदत करून अशा समाजकंटकांना धडा शिकवला पाहिजे..यांना अद्दल घडवायला पाहीजे.. आणि मुस्लिम बांधव सर्व सहन करू शकतो पण मोहंमद पैगंबर सहाब व त्यांचे परीवार व ईतर इस्लाम धर्म बद्दल काहीही सहन करणार नाही.त्यासाठी प्रेत्येक मुस्लिम आपले वेळप्रसंगी प्राण देऊन पण रक्षण करण्यासाठी तत्पर्य आहे.आणि ईतर ही धर्माबद्दल कुठलेही गैर कृत्य काहीच खपून घेणार नाही.. कारण सर्व धर्मांना स्वातंत्र्याचा हक्क संविधान ने दिलेले आहे.आपण जसे पूर्वीपासून या भारत देशात गुना गोविंदाने सामाजिक सलोखा जपत आपसात वागत आहोत त्याच पद्धतीने यापुढेही वागावे व ज्याने गैर कृत्ये केले आहे त्याच्या विरोधात अनेक तक्रारी झालेल्या असून कायदेशीर कारवाई नक्कीच होईल त्याकरिता कोणीही काहीही पोस्ट ,विधान किंवा इतर कुठल्याही गोष्टी करू नये व निषेध म्हणून कायद्याबाह्य बाबी करू नये तसेच शांतता स्वुव्यावस्था टिकून ठेवावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कृत्ये करू नये . विशेष करून बाजारपेठ किंवा गावे शहर बंद वगैरे पुकारू नये जेणेकरून हे आपलेच इतर व्यापारी बांधवांचे नुकसान होईल. व काही गोष्टींचा समाजालाही त्रास होईल. सर्वांनी एकमेकाला सहकार्य करून गुना गोविंदाने वागावे.
या वेळी पीएसआय..एस बुरकुल, पीएसआय..लहाने मॅडम पीएसआय मदने व पोलीस अमालदार के एन ढाकने.आट्टोले ,दांडगे,आंधळे सुधिर ओव्हाळ,पुरी,शिंदे,नुसरत शेख.पत्रकार चंद्रकांत अंबिलवादे मुफीद पठाण, संजय जाधव, चंद्रकांत तारू, मनोज परदेशी, नानक वेदी, शकील खलिफा, रमेश लिंबोरे, रमेश शेळके,कलिम पठाण.नंदकिशोर मगरे, गौतम सोनवणे, निवेदन कर्ते.मुफ्ती रज्जाक, मुफ्ती जमीर पैठण तालुका अध्यक्ष व.ब.पंकज गायकवाड, समाज सेवक कलीम पठाण डॉ शरीफ,आरेफ भाई, मौ. रफिक मौ. युनूस मौ.हबीब मौ. हनिफ. नाजीम भाई,अजीम भाई, बनसोडे,सराटे,अमजद भाई, उपस्थित होते.
0 टिप्पण्या