चित्रा न्युज
मुंबई :-९ वर्षात भाजपने देशात रावणसारखी सत्ता चालवली. ज्याप्रमाणे रावणाने बहरुपी बनून सीता मातेचे अपहरण केले होते आणि त्यांना त्रास दिला. त्याचप्रमाणे भाजपने सुद्धा विकासाचे सोंग घेऊन बहुरूपी बनून देशाचे वाटोळे केल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. भाजपच्या हीन पातळीवरील राजकारणाचा आम्ही निषेध व्यक्त करतो असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यानंतर भाजपविरोधात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
मुंबई प्रदेश काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड सहभागी झाले होते. भाजपकडून राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्याच निषेधार्थ मुंबई काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ९ वर्षात भाजपने देशात रावणराज्य निर्माण केले. महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणाऱ्या भाजपच्या खासदाराला पाठीशी घातले. भाजप सत्तेत असलेल्या मणिपूर मध्ये तेथील आया बहिणींची धिंड काढली जाते. पण तिकडे दुर्लक्ष केले जाते. कोणताही भाजप नेता याबाबत बोलत नाही.
*हे रावणराज नाही तर काय?
विजय वडेट्टीवार म्हणाले, बिल्कीस बानो वर बलात्कार करणाऱ्यांची शिक्षा माफ करून त्यांचा सत्कार केला जातो. हे रावणराज नाही तर काय आहे? रावनराज्य करणाऱ्या भाजपला स्वतःची लंका जळत असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भाजपने आमचे नेते राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी हिन पातळीवरील राजकारण सुरू केले आहे.
याविरोधात आज मुंबई मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात सहभागी होवून भाजपच्या कृतीचा निषेध केला. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या