भवन लिल्हारे कार्य. संपादक ( महा. मध्यप्रदेश , गुजरात ) मो.नं.9373472847
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मौजा कुरुड ता. देसाईगंज (वडसा) येथे शारदा उत्सव मंडळ कुरुड च्या वतीने आयोजित उपकार या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले की, शेतकरी अडचणीत असून त्याला जीवन जगणे कठीण झालेले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सर्वांनाच जीवन जगण्यासाठी अन्न लागते व ते पिकवण्याचे काम शेतकरी करतो. परंतु आज शेतकऱ्याला शेती परवडेनाशी झालेली आहे. खताच्या किंमती दुप्पटीने वाढल्या, कीटकनाशके व बियाण्यांच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ झाली. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्याच्या खर्चात सुद्धा वाढ झाली. अशा रीतीने उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खर्चाच्या तुलनेत हमीभाव मिळाला नाही. मोठ्या प्रमाणावर महागाई वाढलेली असतांना सुद्धा शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. करिता त्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यात नरभक्षी वाघांनी व रानटी हत्तींनी अनेक शेतकऱ्यांचे जीव घेतले. कृषी पंपाला दिवसा वीज न देता ती रात्रीला फक्त आठ तास दिली जाते त्यामुळे शेतकऱ्याला रात्रोला शेतावर जाण्याशिवाय पर्याय नाही. परंतु त्याला सतत वाघांची व रानटी हत्तींची भीती सतावत असते. शासनाने व प्रशासनाने या समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे असतांना मात्र फोल आश्वासनं दिली जातात. अशा फोल आश्वासनांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरटी, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी सरपंच मनोहरजी निमजे, अविनाशजी गेडाम, ओबीसी विभाग प्रदेश सचिव मनोजजी ढोरे, दिवाकरजी मेश्राम, दिनेशजी ठाकरे, शामरावजी ढोरे, शंकरजी पारधी, महादेवजी ढोरे, विजयभाऊ कुंभलवार व गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.
0 टिप्पण्या