भवन लिल्हारे कार्य. संपादक ( महा. मध्यप्रदेश , गुजरात ) मो.नं.9373472847
गडचिरोली : दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी मौजा पिंपळगाव (भोसले) ता. ब्रह्मपुरी येथे जय अंबे माँ सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ शिवाजी चौक पिंपळगाव यांचे वतीने आयोजित "पंख तुटले संसाराचे" या नाट्यपरियोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी त्यांचे अध्यक्षिय भाषणात वाढलेल्या विज दराबाबत खुलासा करतांना सांगितले की, देशात वीज निर्मितीसाठी अदानी ग्रुप विदेशातून कोळसा खरेदी करून देशातील वीज निर्मिती कारखान्यांना पुरवठा करतो व स्वतःच्या वीज निर्मिती प्रकल्पात सुद्धा वापरतो. अदानी ग्रुपने कोळशाची 30 कार्गो जहाजे इंडोनेशिया या देशातून त्याच्या मालकीच्या मुंद्रा पोर्ट वर मागविली ज्याची किंमत 1145.36 कोटी रुपये होती. भारतात आणल्यावर या कोळशाची किंमत त्यांनी 1771.60 कोटी रुपये केली. या व्यवहारात त्यांनी 626.24 कोटी रुपये जास्तीचे आकारून 54% नफा कमविला. अदानी ग्रुपने गुजरात पावर प्लांटला अशाच रीतीने वाढीव दराने कोळशाची विक्री करून 9000 कोटी रुपये मूळ किमतीपेक्षा जास्तीचे घेतले. अशा रीतीने कोळशाची जास्त किंमत आकारल्यामुळे त्यापासून निर्माण होणारी वीज महाग झाली व या महाग झालेल्या विजेच्या दराची वसुली सर्वसामान्य जनतेकडून केली गेली. त्यामुळे अदानीच्या नफ्यासाठी वीज महाग करून सर्व सामान्य जनतेकडून वसुली करण्यात आली. अशा रीतीने या पुंजीपती धार्जिन्या सरकारने वीज वापराचे दर वाढवून वीज वापरणाऱ्या सर्वसाधारण जनतेकडून वसुली करून अदानी सारख्या पुंजीजीपतीचे घर भरण्याचे काम केले. त्यामुळे गरीब श्रीमंत यामधील दरी वाढत चाललेली आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार दिवसाढवळ्या चालू असतांना केंद्रातील मोदी सरकार मात्र मूग गिळून बसलेले आहे, त्याबाबत अवक्षर ही बोलत नाही. करिता भविष्यात सरकार निवडतांना विचारपूर्वक निर्णय घेण्याची विनंती त्यांनी प्रेक्षकांना केली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक चिमूर विधानसभा समन्वयक सतीश भाऊ वारजूकर, माजी जि प सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर, सरपंच सुरेशजी दुनेदार, माजी सभापती केशवरावजी भुते, वडसा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, माजी सरपंच सुनीलजी धांडे, मुख्याध्यापक ओमप्रकाशजी बगमारे, उपसरपंच जगदीशजी बनकर, हेमंतजी खोब्रागडे, शेषरावजी ठाकरे, शेखरजी बोराडे, दादाजी मिसार, संदीपजी मिसार, संतोषजी शेबे, महेशजी ढोक, योगेशजी ठाकरे, मंगेश भुते, गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.
0 टिप्पण्या