Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १९ ऑक्टोबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २७ आश्विन १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास :  आश्विन  
पक्ष :  शुक्ल 
तिथी : पंचमी (२४.३०) ~ षष्ठी  
वार: गुरूवार
नक्षत्र : ज्येष्ठा (२१.००) ~ मूळ  
राशी : वृश्चिक (२१.००) ~ धनु 

*ललिता पंचमी*

*श्री जगदंबा माता यात्रा* पोहरादेवी, वाशिम.
*प.पू. जनार्दन स्वामी महाराज जयंती* नगर.

*डॉ. नारायण दामोधर सावरकर* पुण्यतिथी 
*प.पू. पांडुरंग शास्त्रीआठवले* जयंती 

१२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यू पावल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.
१७८१: ब्रिटिश जनरल कॉर्नवाॕलिस अमेरिकेला शरण गेल्यामुळे अमेरिकन क्रांती युद्ध संपले.
१८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.
१८५३: अमेरिकतील हवाना येथे जगातील पहिली पिठाची गिरणी सुरु करण्यात आली.
१९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
१९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
१९७०:भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द
२००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
२०१९: सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश मिळण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री यांची मंजुरी मिळाली.

जन्मदिवस :
१९५६: चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, राजकारणी आणि पंजाब राज्यातील गुरदासपूर येथील विद्यमान संसद सदस्य अजयसिंग देओल तथा सनी देओल
१९५४:प्रिया तेंडुलकर – रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या. ’जन्मलेल्या प्रत्येकासाठी’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
१९३६:शांताराम नांदगावकर – गीतकार 
१९२५: डॉ. वामन दत्तात्रय तथा वा.द. वर्तक – वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक 
१९२०:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. 
१९१०:सुब्रमण्यन चंद्रशेखर – तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मध्ये  नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील संशोधनासाठी खर्च केला.
१९०२: दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण, लघु कथालेखक, ’किशोरीचे हृदय’, ’विद्या आणि वारुणी’ ही कादंबरी, ’तोड ही माळ’ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले.  

मृत्यूदिन :
१९५०:विष्णू गंगाधर तथा ’दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक 
१९९५:बाल कलाकार म्हणून पुढे आलेली व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेली सलमा बेग तथा ’बेबी नाझ’. 

।। दास-वाणी ।। 

ब्रह्मस्थिती बाणता अंतरीं । 
संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी । 
दृश्याची जुनी जर्जरी । 
कुहिट जाली  ।। 

ऐसा हा परमार्थ । 
जो करी त्याचा निजस्वार्थ । 
आता या समर्थास समर्थ । 
किती म्हणौनि म्हणावें । 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०१/०९/१७-१८ 

ब्रह्मस्थिती एकदा साधकाच्या अंगी बाणली की तो सिद्धपुरूष बनतो.
मग मी खरोखरच ब्रह्म आहे का?
परब्रह्म कशासारखे असेल? असे निरर्थक संशय आपोआपच ब्रह्मांडाबाहेर फेकले जातात. दृश्य प्रपंचाची जर्जर झालेली घोंगडी नष्ट होते.
ब्रह्मं सत्य जगत् मिथ्या । 
हा आत्मभाव जीवामधे रूजतो.

असा हा परमार्थ आहे. पूर्वसुकृतानुसार जो साधक पैलतीर गाठतो तो खरोखरीच भाग्यवान! अशा या समर्थ भाग्यपुरूषाचे महत्व किती किती आणि कसे कसे सांगावे ?

मायिक प्रपंचाचा पडदा दूर सारून मोक्षाची वाट दाखवणाऱ्या या परमार्थाला माझे ग्रंथारंभीच वंदन ! 

परमार्थस्तवन समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या