रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
गडचिरोली :- " सत्य आणि अहिंसेचे महान पुजारी म. गांधीजी आणि 'जय जवान जय किसान ' चा प्राणांतिक नारा देणारे ' स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान 'लाल बहादुर शास्त्रीजी ' या दोन्ही महामानवांची आज 2 ऑक्टो. या जन्मदिनी जयंती नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.वाय .जे. तट्टे सर यांच्या अध्यक्षतेखाली तर श्री.पी.बी. आडे ' कु. समीक्षा भोजने मॅडम यांच्या प्रमख तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली . प्रारंभी सूचने प्रमाणे आजसुद्धा विद्यार्थ्यांनी अख्खा शालेय परिसर स्वच्छ करून म. गांधीजीचा 'स्वच्छतेचा मंत्र दिला. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षां सह अतिथींनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी' लाल बहादुर शास्त्रीजी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन केलेत. प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा कु. समृद्धी भोपळे हिने सांगितली .तर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर ' आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून म. गांधीजी आणि भारतरत्न लाल बहादुर शास्त्री या महामानवांचे जीवनचरित्र सांगण्याचा सुरेख प्रयत्न केलात. श्री. पी.बी.आडे समीक्षा मॅडम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ' मानवतेचे पुजारी ' म. गांधीजी यांच्या सामान्यातून असामान्यत्वाचा प्रवासातून भारतीयांना 'स्वातंत्र्य सूर्य ' बहाल केला. तर ' लाल बहादुर शास्त्री यांनी ज्या मूल्यासाठी देशभक्तीचा लढा देवून आपल्या प्राणांतिक कर्तृत्वाने ' जय जवान जय किसान ' हा नारा कायम जपला. लहान मुले ही परमेश्वराचा अवतार असून त्यांना या महान व्यक्तींचा परिचय कार्यक्रमाच्या माध्यमातून देणे फार महत्वाचे असते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत प्रभावी पणे कु. सेजल सुरजुसे हिने केलेत आणि म. गांधीजीचे ' दे दी हमे आझादी खङ्ग बिना ढाल ' हे राष्ट्रीय गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकलीत .तर कु. संस्कृती माहोरे हिने उपस्थितांचे आभार मानलेत. शिक्षक / शिक्षकेत्तर आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत. अत्यंत सुरेख कार्यक्रमाची सांगता महामानवांच्या जयघोषाने करण्यात आली
0 टिप्पण्या