Ticker

6/recent/ticker-posts

गळफास घेऊन ५३ वर्षीय शिक्षकाची आत्महत्या

 
चित्रा न्युज प्रतिनिधी
 जालना : जिल्हातील भोकरदन तालुक्यातील पारध येथील एका ५३ वर्षीय शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. राजेंद्र ज्ञानदेव जाधव (५३, रा. माहोरा) असे मयताचे नाव आहे.

राजेंद्र जाधव हे पारध येथील एका शाळेत शिक्षक आहे. ते भाड्याच्या खोलीत राहतात. गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या