Ticker

6/recent/ticker-posts

2लाख 7 हजाराची घरफोडी अज्ञात चोरट्यांनी केली

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :- येथील मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दर्शन आनंद छाजेड (३५, रतननगर) घराला कुलूप लावून कुटुंबासह अमरावती येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरूममधील लोखंडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागीने, लॅपटॉप, टॅब, सोनी कंपनीचा कॅमेरा व रोख ८० हजार असा एकूण २ लाख ७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या