सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर मो. 9730901120
रामटेक:- श्रीराम जानकी मंदिर,भक्तिधाम मनसर येथे मागील १६ नोव्हेंबर ते २२नोव्हेंबर पर्यंत सात दिवसाचे भागवत कथा रामायश्री सु श्री रामप्रियाश्री(माई) यांचा मधुर आवाजात संपन्न झाले. सात दिवसाच्या भागवत कथेला मनसर व परिसरातील भक्त मंडळी, बाल गोपाल मोठ्या संख्येने हजेरी लावत होते आज भागवत कथेचे सकाळी हवन कार्य निपटून संपूर्ण गावात दिंडी चे भ्रमण करण्यात आले. नंतर दहीकाला कार्यक्रमानंतर महाप्रसाद करण्यात आले.
कार्यक्रमाचा आयोजनाकरिता माजी आमदार श्री मल्लिकार्जूनजी रेड्डी, सरपंच कैलासजी नरुले, श्री.सोनूजी तिवारी, श्री.राजाभाऊ काठोके, श्री. ईश्वरजी मलघाटे, श्री.मनोजजी मलघाटे, श्री. गजाननजी बोंद्रे, श्री. रुपरावजी इखार, श्री.सुनीलजी सारवे, श्री.दिलीपजी चटप सहित गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या