पती विरुध्द गुन्हा दाखल
पैठण तालुक्यातील हर्षी येथील घटना
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधीऔरंगाबाद
मो.8308128457
औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील हर्षी येथील शुल्लक काणावरुन पतीने पत्नीचा खुन केल्याची घटना दि.१२/११/२०२३ रविवार रोजी सायंकाळी घडली.या प्रकरणी पती विरुध्द पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पैठण तालुक्यातील हर्षी येथे रविवारी श्रीराम निवृत्ती वाघ व पत्नी प्रियंका यांनी दिपावली च्या दीवसी सायांकाळी त्यांच्या रहात्या घरात लक्ष्मीपुजन केल्यानंतर या दोघामध्ये शुल्लक कारणावरुन वाद निर्माण झाला,या वादातुन श्रीराम याने पत्नी प्रियंकाच्या कपाळावर धारदार शस्त्राने जोरदार वार केला.यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली.नातेवाईकांनी तिला तालुक्यातील पाचोड येथील शाहकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रियंका हिला मृत घोषित केले.दि.१३/११/२०२३ सोमवार रोजी प्रियंकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी मृत प्रियंकाचा भाऊ सचिन साहेबराव पवार रा. लाडसावंगी ता.जि.औरंगाबाद फिर्याद दिली आहे.या प्रकरणी डी.वाय.एस.पी जयदत्त भवर यानी घटनास्थळी पाहाणी केली,याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष माने यांनी श्रीराम वाघ याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे. याच दरम्यान गेल्या दहा ते बारा दिवसापुर्वी पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीन येथे पतीने पत्नीचा खुन केल्याची घटना ताजी असताना भर दिवाळी सनाच्या दिवसी तालुक्यातील हर्षी येथील प्रियंका वाघ या महिलेचा पतीने शुल्लक कारणावरुन पत्नीचा खुन केला आहे,त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या