सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर मो. 9730901120
रामटेक;- दिनांक २०/११/२०२३ रोजी पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथील जुनी कामठी नदीवरील दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छटपूजा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांचे स्वागत करून शिवसेना पक्षाचे रामटेक विधानाभा प्रमुख श्री विशालजी बरबटे व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते प्रसाद व फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने शिवसेन (उ.बा.ठा. )पक्षाचे उपजिल्हा प्रमुख श्री.प्रेमजी रोडेकर, पारशिवनी तालुका प्रमुख श्री.कैलासजी खंडार, युवासेना जिल्हा प्रमुख श्री.लोकेशजी बावनकर ,विधानसभा संघटक श्री.रमेशजी तांदुळकर, उपतालुका प्रमुख श्री.सुनिलजी सहारे, कन्हान शहर प्रमुख श्री.प्रभाकरजी बावणे, टेकाडी सर्कल प्रमुख श्री. जितेंद्रसिंग जांबे व युवासेनेचे कन्हान शहर प्रमुख सनी पात्रे,उपतालुका प्रमुख पंकज प्रजापती प्रफुल वासनिक, शाहरुख खान सह अक्षयलाल चव्हाण, राकेश गोसावी, उदयप्रकाश शर्मा, मनोज तिवारी, अजय सिंग तसेच पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या