सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर मो. 9730901120
रामटेक :- दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी मानापुर ता.रामटेक येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत अँड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप मानापुर येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
साई विजन केअर एंड ऑप्टिकलस येथिल तज्ञ डॉ. राहुल ताकोद यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ पतासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण- १९४ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२७ व चष्मे करिता १६७ लाभार्थींनी लाभ घेतला. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्री.संदीपजी सावरकर, उपसरपंच श्री.भारतजी अडकणे, सदस्य श्री.राहुलजी वाढरे, श्री.एन.व्ही. नेवारे, श्री. राहुलजी हिंगे, श्री.मुकेशजी सावरकर, श्री.गणपतजी डोकरीमारे, श्री.श्रीचंदजी सातपुते, श्री.विष्णूजी समरीत, श्री.गौरव पनवेलकर, श्री.सुमित कामड़े, श्री.निखिल कडू व समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या