Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - २७ नोव्हेंबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. ६ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द  ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास : कार्तिक
पक्ष :  शुक्ल   
तिथी : पौर्णिमा (१४.४०) ~ प्रतिपदा            
वार:   सोमवार
नक्षत्र : कृत्तिका (१३.३०) ~ रोहिणी
राशी : वृषभ 

*कार्तिक स्वामी दर्शन* (दुपारी १.३० पर्यंत) 
*कार्तिक पौर्णिमा* (समाप्ती दु. २.४०)
*कार्तिक स्नान समाप्ती*
*तुलसी विवाह समाप्ती*

*गुरू नानक जयंती*
*गुरू परब*

*निंबार्काचार्य जयंती*
भविष्य पुराणानुसार, आणि निंबार्क संप्रदायाच्या उपनाम परंपरेनुसार, श्री निंबार्काचार्य सुमारे ५००० वर्षापूर्वी  ई.स. पूर्व ३०९६ मध्ये प्रकट झाले, तेव्हा अर्जुनाचा नातू सिंहासनावर होता. परंपरेनुसार, निंबार्काचा जन्म महाराष्ट्रातील पैठण जवळील मुंगी गावात कार्तिक शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यांचे आई-वडील अरुण ऋषी आणि जयंती देवी होते. ते दोघे नंतर मथुरा येथे स्थलांतरित  झाले आणि बरसाना व गोवर्धन यांच्यामध्ये असलेल्या निंबाग्राम (नीमगाव) ला स्थायिक झाले. *निंबार्काचार्यांनी द्वैत-अद्वैत तत्वज्ञानाचा व कृष्णभक्तीचा पुरस्कार केला.*

१९९५:पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ च्या  शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.
१९४९: जबलपूर नगरपालिकेत तेथील लोकांनी वर्गणी गोळा करून साहित्यिक सुभद्रा कुमारी यांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याचे अनावरण सुभद्रा कुमारी यांची  बालपणीची मैत्रीण कवयत्री महादेवी वर्मा यांच्या हातून करण्यात आले.

जन्मदिवस :
१९८६:सुरेश रैना – क्रिकेटपटू
१९५२: बप्पी लाहिरी गायक-गीतकार आणि सिने निर्माते.  
१९४०:ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ 
१९१५:दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. 
१९०७:हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी 
१८९४: कोनसुके मात्सुशीता पॅनासोनिक चे संस्थापक  
१८८८: गणेश वासुदेव मावळंकर भारतीय लोकसभेचे पहिले  सभापती.
१८७०: दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक

मृत्यूदिन :
२००८:विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे 
२००२: शिवमंगल सिंग 'सुमन', कवी आणि शैक्षणिक 
२०००: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक.
१९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग.
१९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित
१९७८:लक्ष्मीबाई केळकर, समाजसेविका, राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका 
१९७६:गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार 
१९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर 
१९५२:शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार 

*।। दास-वाणी ।।* 

वेर्थ संशयाची भक्ती । 
वेर्थ संशयाची प्रीती । 
वेर्थ संशयाची संगती । 
संशयो वाढवी  ।। 

वेर्थ संशयाचें जिणें । 
वेर्थ संशयाचे धरणे । 
वेर्थ संशयाचें करणें । 
सर्व कांही  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०५/१०/१८-१९ 

ईश्वर असेल का? असला तर मला भेटेल का? अशी श्रद्धाहीन भक्ती फळ देत नाही. मनात संशय ठेवून केलेले प्रेम टिकत नाही. संगत राखतानाच संशय असेल तर संगतही तुटते.
मनी संशयो वाऊगा तो त्यजावा । 
हे वचन ध्यानात ठेवावे.

संशयाने भरलेले जीवन, अविश्वासाने हाती घेतलेेेले कोणतेही कार्य वायाच जाते. संशयापोटी जे करायला हवे तेही आपण करत नाही. त्यामुळे हे अकार्य देखील नुकसानच घडवते.

शंका अज्ञानापोटी येते.
संशय अहंकारातून येतो.
संशय हा साधनामार्गातील मोठा अडथळा आहे. साधकाने तो हरप्रकारे टाळलाच पाहिजे, तरच तो सिद्धत्व प्राप्त करू शकतो.

सिद्धलक्षण समास.

     🙏💐💐💐💐💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या