Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर येथे समता सैनिक दलाचे दोन दिवशी शिबिर संपन्न

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका मो.9552073515


चंद्रपूर :- भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभागाच्या वतीने "विदिशा बुद्ध विहार गौतम नगर चंद्रपूर" येथे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 2023 शनिवार रविवार ला दोन दिवसीय "समता सैनिक दलाचे शिबिर" चे आयोजन करण्यात आलेले होते.
         दिनांक 18 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 11.00 वा इंजी. नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण केले.या नंतर  सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन तथागत  भ.गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांनाअगरबत्ती, मोमबत्ती प्रज्यलीत करून ,पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन केले या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आद भाऊराव दुर्योधन चंद्रपूर शहर उपाध्यक्ष संस्कार विभाग होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून लाभलेले आद प्रफुल भगत मेजर, जिल्हा उपाध्यक्ष तसेच आद गुरु बालक मेश्राम मेजर तसेच या शिबिराला मार्गदर्शक म्हणून असलेले आद अशोक पेरकावर लेफ्टनं कर्नल, आद संदीप सोनोणे युनिट लीडर,आद शेषराव सहारे केंद्रीय शिक्षक,आद राकेश रंगारी भद्रावती तालुका अध्यक्ष उपस्थित होते.दोन दिवसीय शिबिरामध्ये वार्डातील 35 युवक युवती तसेच धम्म उपासक उपासिका यांनी सहभाग घेऊन सैनिक दलाचे प्रशिक्षण घेतले. दिनांक 19 ला शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमांमध्ये,उपस्थित प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट प्रशिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी ना बुद्ध आणि हिजधम्म हा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विदिशा बुद्ध विहारा च्या अध्यक्ष आयुनि विमल दुपारे ताई यांना बुद्ध अँड हीज धम्म हा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर या शिबिराला प्रशिक्षण देणारे आद प्रफुल भगत तसेच आद गुरुबालक मेश्राम मेजर यांना बाबासाहेबांचे समता सैनिक दल हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी समारोपीय  कार्यक्रमाला आयुनि.जास्वंती ताई माऊली कर केंद्रीय शिक्षिका आणि आयुनि ज्योतीताई वैरागडे केंद्रीय शिक्षिका उपस्थित होते.उदघाटन कार्यक्रम चे संचालन आद कृष्णक पेरकावर केंद्रीय शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शनआद किशोर तेलतुंबडे चंद्रपूर शहर सरचिटणीस यांनी केले. शेवटी संस्थेच्या नियम प्रमाणे सरणतय घेऊन शिबिराची सांगता झाली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या