Ticker

6/recent/ticker-posts

संततधार पावसाने फुटलेला मामा तलाव दुरुस्तीचे प्रतीक्षेत

• रामपुरी येथील प्रकार 


• लोक प्रतिनिधींची उदासीन भूमिका

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- स्वातंत्र्य दिनाचे पूर्व संध्येला झालेल्या संततधार अतिवृष्टीने रामपुरी येथील मामा तलावाची पाळ फुटून पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आजूबाजूच्या धान उत्पादकांचे नुकसान झाले. या बाबद पाटबंधारे विभागाला माहिती असूनही १५ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा दुरुस्तीचे सौजन्य दाखविले गेले नाही. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने पावसाचे पाणी संचय होणार नसल्यामुळे मत्स्य पालन सहकारी संस्थेसही अडचणीचे ठरणार असले तरी लोक प्रतिनिधींकडून मामा तलाव दुरुस्ती संबंधाने कसलेही प्रयत्न केले गेले नाही. हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. 
          भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, उन्हाळ्यात वन्य प्राण्यांची पिण्याचे पाण्याची व्यवस्था व्हावी. तसेच मत्स्य पालन संस्थेची मत्स्य पालन व मासेमारीची सोय व्हावी आणि शासनाला शेष मिळावा. या करिता ४५ ते ५० वर्षापूर्वी रामपुरी वनक्षेत्रात तलावाची निर्मिती करण्यात आली. देखभाल व दुरुस्तीचे काम पाटबंधारे उपविभाग साकोली यांचेकडे सोपविण्यात आले. सद्यस्थितीत पाटबंधारे उपविभाग साकोली चे उपअभियंता आर. ई. सेलोकर यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता बेलेकर यांचेकडे आहे. मनुष्य बळाअभावी तथा दुर्गम परिसरात हा तलाव येत असल्याने संबंधित विभागाने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
            रामपुरी मामा तलाव अंदाजे १०० हेक्टर क्षेत्रात पसरलेला असून वन क्षेत्राचे मध्यभागी असल्याने उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था होते. तसेच दी. मत्स्य पालन सहकारी संस्था रामपुरी नोंदणी क्रमांक ११४६ यांनी पंचायत समिती लाखनी येथे २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी ४२ हजार ५०० रुपये सरकार जमा करून मत्स्य व्यवसायासाठी लिज वर घेतले आहे. पण १४ ते १६ ऑगस्ट २०२२ दरम्यान अतिवृष्टीने क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यामुळे गेट जवळून तलाव पाळ फुटून मासे वाहून गेल्याने नुकसान झाले. तलाव फुटल्याची माहिती होताच पाटबंधारे उपविभाग साकोली चे उपअभियंता घटनास्थळी आले होते. पण १५ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा तलाव दुरुस्तीसाठी कसलेही प्रयत्न केले गेले नाही. तरीही लोक प्रतिनिधींची चुप्पी तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. सध्या पावसाळ्याला सुरू अत झाली असल्याने दुरुस्ती होणार का ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

मामा तलावाची मालकी कुणाकडे
पाटबंधारे विभागाने रामपुरी मामा तलाव हस्तांतरणासाठी कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचेकडे सर्व कागदपत्र पाठविली व पत्र व्यवहारही केला. पण हस्तांतरणाचा तिढा आजही कायम आहे. त्यामुळे ह्या तलावावर मालकी कुणाची असा वाद सुरू आहे. 


प्रतिक्रिया
मामा तलाव रामपुरी ऑगस्ट २०२२ मध्ये आलेल्या अतिवृष्टीने फुटल्याने संबंधित विभागाने १५ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा दुरुस्ती केली नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय व  सिंचन सोयीस शेतकरी मुकला आहे. 
रजनीश भालेराव, पोलिस पाटील, रामपुरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या