Ticker

6/recent/ticker-posts

डोंबिवली मध्ये चक्क आम्ली पदार्थ विक्री!

सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी ठाणे मो.9834081563

ठाणे :- डोंबिवलीतील हाय प्रोफाईल पसिरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीमधील खोणी येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवीन वर्ष सुरू व्हायला आता एकच महिना उरला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी डिसेंबरअखेरीस पार्ट्यांचे सत्र सुरू होते. त्या दरम्यान असा पार्ट्यामध्ये तरूण अनेक व्यसने करतात, अमली पदार्थांचाही त्यात समावेश असतो. अशा वेळी पोलिस तरूणांवर कारवाई करतात. त्याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिना संपतानाच डोंबिवलीत अमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे.
त्यामध्ये दोन तरूणांना अटक केली तसेच त्यांच्याकडून एमडी नावाचं ड्रग्स आणि अडीच लाख रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. या परिसरातील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात पोलिसांना यश मिळालं. ड्रग्स विकणाऱ्या दोन्ही तरुणांना मानपाडा पोलीस स्थानकात आणण्यात आले असून हे ड्रग्स किती ग्राम आहे व कोणाला विकण्यासाठी आणले होते याचा तपास पोलिसांनी सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या