Ticker

6/recent/ticker-posts

राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत .सदस्यांसाठी नवे नियम जारी !

सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी ठाणे मो.9834081563

ठाणे :-संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी अनेक नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आली आहे. यानुसार आता राज्यसभा सभागृहात कोणत्याही सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच, कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होणार आहे.
राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात अली आहे.
राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभा सदस्यांना लिखित भाषण वाचता येणार नाही. राज्यसभेतील कार्यवाही सुरू असताना व्हिडिओग्राफी करायला बंदी केली आहे. यासोबतच संपूर्ण संसद परिसरामध्ये धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या