रुपाली मेश्राम कार्य.संपादिका मो.9552073515
बुलढाणा - मेहकर उपविभागातील मेहकर, लोणार, तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे. आशी मागणी तथागत ग्रुपच्यावतिने मा.मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा.पोलीस अधिक्षक साहेब बुलढाणा यांना निवेदनाव्दारे करण्यात येत आहे की मेहकर उपविभागातील मेहकर, लोणार तालुक्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत वरली, मटका, ताजी वरली, विना परवाना ऑनलाईन लॉटरी, विनापरवाना अवैध पत्यांचे क्लब, अवैध दारु विक्री,अवैध वाहतुक, अवैध गुटखा विक्री तसेच अवैध राशन विक्री आदी सर्व अवैध धंदे सर्रास पणे सुरु आहे. या अवैध धंद्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, कमी वयातील मुले दारुच्या आहारी जावून गुन्हेगारी कडे वळत आहेत व रात्री बेरात्री टु व्हीलर घेऊन धुम ठोकत आहे यामुळे रस्त्यावरील महीला असो व माणसे यांना त्रास सहन करावा लागत आहे आणी झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी वरली व ताजीवरलीचे व्यसन त्यांना लागले आहे. त्यामुळे ते आर्थिकरित्या उध्दस्त होत आहे, या अवैध धंद्यामुळे सदर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असुन, ग्रामीण भागात अवैध दारु विक्रीमुळे घरगुती हिंसाचार तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. सदर अवैध धंदे संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिसांच्या आशिर्वादाने वा अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे सुरु आहेत. तरी वरील पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने बुलढाणा येथे आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा ईशारा देण्यात येत आहे..
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई, गौतम नरवाडे, कुणाल माने, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, विजय सरकटे , देवानंद अवसरमोल, सचिन गवई, दुर्गादास अंभोरे, सिताराम गवई, महादेव मोरे, नितीन बोरकर, युनुस शहा, नितीन गवई आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते..
0 टिप्पण्या