प्रवीण शेंडे जा. संपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो. 9834486558
गोंदिया - आज सकाळी माझे काका यशवंतराव वैद्य वय ७७ वर्षे, यांना थोडा श्वासोच्छ्वास घेणाच्या त्रास होता, वयोमानानुसार शरीर ही थकले होते, पण माझी काके बहीण रमा ने हिंमत न हारता दवाखान्यात नेण्याच्या तयारीत होती, तिला वाटले सकाळची वेळ आहे, घरचे कामे आटोपून घेतो, तो पर्यंत मोठी बहीण अंतरा येऊन जाईल असे तिला वाटले, पण काळाने वाट न पाहता सकाळी ९:५० ला माझ्या काकांनी अखेर चा श्वास घेतला आणि आमचा साथ सोडला. नंतर वातावरण शोकमय झाले, नातेवाईकांना फोन करून दुःखद बातमी देण्यात आली, थोड्यावेळाने मी रमाला विचारले, कुठे न्यायचे आहे, तर तिने सांगितले की, माझ्या वडिलांनी दवाखान्यात देण्याचे सांगितले होते, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझाही देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे करावे, दिवंगत यशवंतराव वैद्य यांचे इच्छेप्रमाणेच आज दि. १९/११/२०२३ ला दुपारी तीन वाजता त्यांची मुलगी *रमा* आणि *अंतरा* हिने वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे देहदान केले. या प्रसंगी वैद्य परिवारातील सर्व नातेवाईकासह प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेविका *भावना ताई कदम*, उपस्थित होत्या.
माझे वडील दिवंगत सुर्तिसेन वैद्य यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया इथे २८ मार्च २०१७ ला तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसानिमित्त देहदान आणि अवयवदान फार्म भरुन संकल्प घेण्याचा कार्यक्रम घेतला होता, त्या संकल्पाची पुर्तता माझ्या परिवाराकडून होत आहे, या आधी माझे वडील दिवंगत सुर्तिसेन वैद्य याचे देहदान करण्यात आले, आणि आज माझे काका यशवंतराव वैद्य यांचे देहदान करण्यात आले.
आज जी आपल्या समाजात प्रथा आहे अग्नि देणे किंवा माती देणे, यावर थोडा विचार करावा, जे शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी नसेल अशा शरीराला अग्नी कींवा माती दिले ठीक आहे, पण जे शरीर चांगले आहे, त्या मानवी शरीराला वैद्यकीय शिक्षणासाठी दान द्या, आपल्या देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. ज्या व्यक्ती चे काही अवयव कामात येऊ शकतात, दुसऱ्या ला नवे जिवन देऊ शकतात. यासाठी अवयव दान करा, काळ फार बदललेल्या आहे. आपण ही थोड बदलण्याचा प्रयत्न करा, आणि घ्या संकल्प अवयवदान आणि देहदानाचा !
धनंजय वैद्य गोंदिया
0 टिप्पण्या