Ticker

6/recent/ticker-posts

जिजामाता माध्यमिक विद्यालय घोडेगांव येथे गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांची अचानक भेट, अनेक कर्मचारी गैरहजर तर मुख्याध्यापक उशिरा शाळेत हजर ! कारवाई कडे सर्वांचे लक्ष..?

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098             

जामखेड :- ग्रामस्थांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून  जिजामाता माध्यमिक विदयालय घोडेगांव ,ता . जामखेड येथे गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी सकाळीअचानक भेट   दिली त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक , शिक्षक उशिरा आले तर काही शिक्षकेतर कर्मचारी तीन महिन्यापासून गैरहजर असल्याचे दिसून आल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचा बडगा उगारला असून  त्यांनी
 माध्यमिक विभागाकडे चांगले च लक्ष दिल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागात चांगली खळबळ उडाली आहे .        
         याबाबत माहिती अशी की , घोडेगांव येथील माध्यमिक विद्यालयातील शाळा भेटीच्या वेळी या शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोराटे एम्. ए .हे स्वतः उशिरा आले .शाळेतील लिपिक श्री. फाटके बी.एन . हे दि . १३ सप्टेंबर २३  पासून ते आज अखेर गैरहजर आहेत शिपाई श्री भोंडवे आर् . एस् . हे दि. १ नोव्हेंबर २३ पासून तर श्री. रासकर बी. के. प्रयोगशाळा परिचर हे शालेय कामी गैरहजर दिसून आले .
      शाळेत एकूण दोन शिक्षक व पाच शिक्षकेतर कर्मचारी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी गैरहजर आढल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या