चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा - हिंगणा काझी दोन ते अडीच हजार लोकवस्ती असलेले गाव आहे.तेथील युवकांनी संकल्प केला कि वंचितांना एकत्र करून त्यांना सत्तेत स्थान देण्यासाठी एकच नेता काम करीत आहेत ते म्हणजे अॅड बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा समोर घेऊन जात आहे. तेव्हा युवकांनी वंचित बहुजन आघाडी ची शाखा स्थापन करण्याचे नियोजन केले. सुरुवातीला तेथील वाड्यातील काही लोकांनी विरोध केला परंतू युवकांनी ठरवलेले कि आज युवा पिढीने समोर येणे गरजेचे आहे.
शाखा उदघाट्ने संदर्भात बैठक घेऊन युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक घरात जाऊन माहिती दिली व बैठकीला येण्याची विनंती केली. बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. "आपण काही RSS ची शाखा उघडत नाही आहोत तर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नातवाची शाखा उघडत आहोत" अशी तेथील नागरिकांनी बैठकीत प्रतिक्रिया दिली. या शाखेला तेथील काही लोकांनी विरोध दर्शवुन पण कोणत्याही परिस्थिती मध्ये शाखा उघडायची असा युवकांनी निर्धार करुन गावातील फक्त बौद्ध समाजातीलंच नाही तर मुस्लिम, कासार, खाटीक, धनगर अशा विविध समाजातील व्यक्तीना प्रतिनिधित्व देऊन सर्वांना शाखेत सामावून घेतले. भविष्यातील सर्व आव्हानांना एकत्रित सामोरे जाण्याचा निर्धार करत हिंगणाकाझी गावात वंचित बहुजन आघाडी च्या शाखेच उदघाट्न करण्यात आले.
0 टिप्पण्या