Ticker

6/recent/ticker-posts

पोर्ला परिसरात बोगस कामाचा बोलबाला ? 🔹10 लाखाचे काम झाले 25 लाखात मग हात रंगले कुणाचे ?



चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :-जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग गडचिरोली, या कार्यालया अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पोर्ला येथे लिलाबाई शिवणकर यांच्या घरापासून ते राकेश निशाने यांच्या घरापर्यंत झालेल्या सी. सी. रोड.कामाची अंदाजे किंमत 10 लाख रुपये किंमतीचे असताना सुद्धा. झालेल्या थातूर मातूर कामाची किंमत सबंधित विभागाने 25 लाख रुपये दाखवून बांधकाम विभागाने व सबंधित ठेकेदारांनी कामाच्या माध्यमातून आप - आपले खिसे  गरम करून शासनाची फसवणूक केली आहे.
त्यात अभियंते व सबंधित ठेकेदार, ग्रामसेवक, अधिकारी आणि  काही प्रमाणात राजकीय पदाधिकारी यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. तरी त्यांचेवर त्वरित कारवाई करण्यात येऊन  फोजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना सेवेतून बडतर्फे करण्या साठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे. व त्यच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदे पुढे दिनांक 14.12.2023 पासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तसेच तालुका स्तरावर रोहियो कामात बराच भ्रष्टाचार झालेला असून त्या ...त्या कामाची चोकशीची मागणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या