🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ३ डिसेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. १२ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : कार्तिक
पक्ष : कृष्ण
तिथी : षष्ठी (१९.३०) ~ सप्तमी
वार: रविवार
नक्षत्र : आश्लेषा (२१.३०) ~ मघा
राशी : कर्क (२१.३०) ~ सिंह
जागतिक दिव्यांग दिन
राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन
१७९६: दुसरे बाजीराव मराठा साम्राज्याचे पेशवे बनले.
१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.
१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.
१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे दुःसाहस केले.
१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
१९८९: रशियाचे राष्ट्रपती खाईल गोर्वाच्योव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी शीतयुद्ध संपल्याची घोषणा केली.
२००८: आतंकवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस
१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर
१८८२: जगद्विख्यात चित्रकार नंदलाल बोस
१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव.भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि पहिले केंद्रीय कृषी मंत्री (१९४६), भारतरत्न, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त ३ डिसेंबर हा दिवस “कृषी शिक्षण दिन” म्हणून निश्चित केला आहे.
१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस
१८९२: कवी माधव केशव काटदरे
मृत्यूदिन
१५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर
१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस
१९५१: कवयत्री बहिणाबाई चौधरी
१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय
१९७१:परमवीर चक्राने सम्मानित भारतीय सैनिक अल्बर्ट एक्का यांना वीरमरण.
१९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद
२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद
*।। दास-वाणी ।।*
सिद्ध साधू आणि साधक ।
मंत्र यंत्र शोधक ।
येकनिष्ठ उपासक ।
गुणग्राही ।।
संत सज्जन विद्वज्जन ।
वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन ।
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान ।
विमळकर्ते ।।
।। जय जय रघुवीर सनर्थ ।।
दासबोध : ०१/०८/१२-१३
माझ्या या सभेमधे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आहे. काही सिद्धपुरूष साधु तर काही उत्तम साधक आहेत.
इथे मांत्रिक तांत्रिक ही आहेत तर काही श्रीयंत्रासारख्या यंत्राचे नित्यपूजक आहेत. विविध मार्गी असले तरी हे सभासद आपापल्या उपासनेशी अत्यंत एकनिष्ठ आहेत.
तसेच ते गुणांवर प्रेम करणारे आहेत.
ते साक्षात संतस्वरूप आहेत. साच आणि मवाळ असे ते सज्जन आहेत
ही सभा विद्वानांची आहे.
वेदांती, शास्त्र जाणणारे, श्रेष्ठ नागरिक याच सभेमधे मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात.
ते अत्यंत बुद्धिमान, सर्वज्ञ पूर्णतृप्त असून काही जण मंगलकार्ये करणारे विद्वानही आहेत. अशा सभेसमोर ग्रंथ सांगताना मला सार्थक झाल्यासारखे वाटत आहे आणि मी नतमस्तक आहे.
सभास्तवन समास.
🙏💐💐💐💐💐🙏
0 टिप्पण्या