विजय केदारे तालुका प्रतिनिधी पैठण जि.छ.संभाजी नगर मो.९९२३१६७४९७
पैठण :- तालुक्यातील लोहगाव ता. पैठण जिल्हा छ.संभाजी नगर येथील स्व. व्हि. डी. पाटील इंग्लिश स्कूल व महाविद्यालयाच्या मैदानात प्रमुख पाहुणे अनिल डांगे,रामेश्वर शेळके.........व संस्थेचे सचिव प्रा. राम गरड यांच्या हस्ते (दि.०२) शनिवार रोजी सकाळच्या सत्रात दिप प्रज्वलन करून विद्येची देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात आनंदनगरी कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी बाल विद्यार्थ्यांनी वेग वेगळे अन्न पदार्थ घरून तयार करून या आनंद नागरी मधे स्टॉल मांडून विक्री केले . व तेच पदार्थ बाल विद्यार्थ्यांनी विकत घेतले.व आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला.आपल्या जीवनात व्यावहारिक ज्ञानाचे अधिक महत्व या विषयावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा. राम गरड, मुख्याध्यापिका रोहिणी गरड, सहशिक्षक गिरी सर,सचिन एरंडे, रविंद्र कानोले, विनीत देशमुख, शिक्षिका सोनाली एरंडे भक्ती डांगे, सुवर्णा शेळके, अश्विनी बर्डे, घूले मिस, डांगे मिस आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या