• म.रा. ग्रामसेवक संघटना डी.एन.ई. १३६ चे बीडीओंना निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- जुनी पेन्शन या मागणीसाठी गुरुवार १४ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित बेमुदत संपात सहभागी होत असल्याबाबद महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी.एन.ई. १३६ तालुका शाखा लाखनी चे सचिव अमित चुटे यांचे नेतृत्वात गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
२००५ नंतरच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पेन्शन(सेवानिवृत्ती वेतन) असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जुनी पेन्शन या मागणीकरिता जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या माध्यमातून १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांनी दिनांक ८/१२/२०२३ रोजी संपाचे नोटिसही दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी.एन.ई. १३६ तालुका शाखा लाखनी चे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होत आहेत. या बाबद तालुका सचिव अमित चुटे यांचे नेतृत्वात लाखनी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन देण्यात आले आहे. तथा निवेदनाच्या प्रतिलीपी उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) जिल्हा परिषद भंडारा तसेच अध्यक्ष/सरचिटणीस महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी.एन.ई. १३६ जिल्हा भंडारा यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी मंगला साखरकर, हेमंत कावळे, नरहरी बारस्कर, अजय राऊत, सुनील तरजुले, लालचंद मेश्राम, योगेश माटे, राजेश ढवळे, मंगला येरणे, रत्नमाला बावनकुळे, प्रीती वैद्य इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या