Ticker

6/recent/ticker-posts

क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून मारहाण


• दैतमांगली येथील घटना 

• पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :- शेतशिवारात रानडुक्करांना हाकलण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत असताना लगत च्या शेतातील नातेवाईकांनी येऊन अश्लील शिवीगाळ करून थाबडबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी(ता.१३) रात्री ८:०० ते ९:०० वाजता दरम्यान दैतमांगली शेतशिवारात घडली. अर्जदाराचे नाव ज्ञानेश्वर दसाराम लोणारे(५१), तर गैरअर्जदाराची नावे धर्मेंद्र काशिनाथ लोणारे(३८), भूमीता धर्मेंद्र लोणारे(३५), सम्यक धर्मेंद्र लोणारे(१९) सर्व राहणार दैतमांगली, तालुका लाखनी असे आहे. लाखनी पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
           अर्जदार व गैरअर्जदार हे सख्खे नातेवाईक असून घराशेजारी वास्तव्यास आहेत. तसेच शेतही जवळजवळ आहेत. तलावाचे पाण्यावरून त्यांच्यात मागील १ वर्षापासून भांडण असल्याने बोलाचाली बंद आहे. ज्ञानेश्वर लोणारे हा आपले नातेवाइकांसह बुधवारी सायंकाळचे सुमारास शेतावर गेला असता गैरअर्जदार धर्मेंद्र लोणारे व त्याची पत्नी भुमीता ही सुद्धा आपले शेतावर आले. ज्ञानेश्वर हा डुक्करांना हाकळण्यासाठी होरे हो असे मोठ्याने ओरडले असता धर्मेंद्र ने त्याचे जवळ येऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व त्याचे पत्नीने शिवीगाळ केली असता त्याच्या नातेवाईकांनी भांडण सोडविले व घरी परत आले तेव्हा गैरअर्जदार धर्मेंद्र, भुमीता व सम्यक याने अर्जदार ज्ञानेश्वर चे मुलाला हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यामुळे कमरेला व हाताला दुखत आहे. असे ज्ञानेश्वर याचे फिर्यादी वरून व वैद्यकिय अहवालावरून लाखनी पोलिसांनी एनसी क्रमांक ५६४/२०२३ कलम ३२३, ५०४, ५०६ भादवि नुसार एनसीआर ची नोंद केली. प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराविरोधात न्यायालयातून दाद मागण्याची समज देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या