लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो 9689821132
हिमायतनगर -: तालुक्यातील मौजे पार्डी येथील पोलीस पाटील जागेसाठी उपविभागीय अधिकारी यांनी पोलीस पाटील भरती प्रक्रिया व मुलाखत घेतली होती त्या परीक्षेत घव घावित यश संपादन करून पार्डी या गावच्या पोलीस पाटील होण्याचा बहुमान निकिताताई रवी जोनापल्ले यांनी मिळविला आहे त्या नाभिक समाजाचे तरुण तडफदार कार्यकर्ते एक मन मिळाऊ व्यक्तिमत्त्व रवी जोनापल्ले यांच्या पत्नी आहेत
नांदेड जिल्हाचे लक्ष लागून असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया मध्ये अनेक विद्यमान आमदार व खासदार अशा लोकप्रतिनिधीने आप आपले वर्चस्व पनाला लावले होते पण ही पोलीस पाटील भरती प्रक्रिया एकदम पारदर्शक झाल्यामुळे या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित व तरुण वर्गांना पोलीस पाटील होऊन गावचा कारभार पाहण्याची संधी प्रशासनातर्फे मिळाली आहे त्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील मोजे पारडी येथील निकिता रवी जोनापल्ले या उच्चशिक्षित तरुणीने पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या दि 17 जानेवारी घेण्यात आलेल्या मुलाखती मध्ये घवघवीत असे यश संपादन करून दि 19 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निवड यादी मध्ये मौजे पार्डीच्या पोलीस पाटील म्हणून त्यांची निवड झाली आहे त्यामुळे निकिता ताई रवी जोनापल्ले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेकडून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या