भालचंद्र गवळी जिल्हा प्रतिनिधी पुणे मो.90752 49024
पुणे : सध्या महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातील राजकारण फार विचित्र झाले आहे. त्यामुळे राजकारणामध्ये रोज काही ना काही विचित्र प्रकार घडत आहेत. असाच एक आजपर्यंत कधीही न घडलेला प्रकार समोर आला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी दोन उपमुख्यमंत्री झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. तसाच काहीसा प्रकार शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायतीत घडला आहे. तेथेही चक्क दोन उपसरपंच निवडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण स्वाती बाळासाहेब लांडे व मनोज उर्फ विशाल विलास आल्हाट या दोघांची एकाच दिवशी उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याबाबत सोशल मिडीयावर या निवडीच्या प्रकरणाचा धुमाकूळ उडाला असून सर्वत्र खळबळ झाली आहे. सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दोन उपसरपंच निवडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यापूर्वी शासनाकडे करण्यात आलेली होती. पण अजूनपर्यंत अशा दोन उपसरपंच निवडीला शासनाकडून परवानगी मिळाली नाही. परंतु नुकतेच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झालेले असताना सरपंच अंकिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांचे नियंत्रणाखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच अंकिता भुजबळ, मावळते उपसरपंच राहुल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भुजबळ, सचिन ढमढेरे, संतोष ढमढेरे, नवनाथ ढमढेरे, सुरेश भुजबळ, रोहिणी तोडकर, अनिल भुजबळ, स्वाती लांडे, कोमल शिंदे,
0 टिप्पण्या