Ticker

6/recent/ticker-posts

.💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐

‌          🌞 दिन विशेष  🌞

‌इसवी सन २०२४ - २१ जानेवारी 

‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०८०

‌भा. रा. १ माघ १९४५,

युगाब्द  ५१२५

संवत्सर नाम : शोभन

अयन : उत्तरायण

ऋतू : हेमंत

मास: पौष 

पक्ष:  शुक्ल  

तिथी: एकादशी (१९.३०) ~ द्वादशी                

वार:  रविवार

नक्षत्र : रोहिणी (२७.५०) ~ मृग     

राशी :   वृषभ 


*पुत्रदा एकादशी*

*भारतीय राष्ट्रीय सौर माघ मासारंभ*


*पू. दासगणू महाराज जयंती* (तिथीनुसार)

*रासबिहारी बोस स्मृतीदिन*

*जागतिक आलिंगन दिन*


'पूर्वेस शुक्रोदय'


२०००:’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

१९७२:*मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय* यांना राज्याचा दर्जा मिळाला. या राज्यांचा स्थापना दिवस.

१९५८: कॉपीराईट कायदा लागू झाला.

१८०५:होळकर व जाट सैन्याने भरतपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

१७९३:राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

१७६१:थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.


जन्मदिवस :

१९८६: भारतीय सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंग राजपूत 

१९५३:पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक

१९२४:प्रा. मधू दंडवते – केंद्रीय रेल्वे मंत्री, लोकसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ 

१९१०:शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ’भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ’संत तुकाराम’ चित्रपटातील ’आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकाराम महाराजांचाच आहे असे वाटते. १८९४:माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते 

१८८२:वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक 


मृत्यूदिन:

२०१६: प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई

१९९७: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख 

१९६५:हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री

१९४५:रास बिहारी घोष – क्रांतिकारक (टोकीओ मध्ये निधन)

१९४३:क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 

१९२४:ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक 


*।। दास-वाणी ।।* 


विश्कळीत मातृका नेमस्त कराव्या । 

धाटया जाणोन सदृढ धराव्या । 

रंग राखोन भराव्या । 

नाना कथा  ।। 


जाणायचें ते सांगतां न ये । 

सांगायचे ते नेमस्त न ये । 

समजल्याविण कांहींच न ये । 

कोणीयेक  ।। 


।। जय जय रघुवीर समर्थ ।। 

 दासबोध  : ११/०६/०२-०३ 


महंताने ग्रंथ लेखन करताना विस्कटलेल्या काना मात्रा वेलांटया दुरूस्त करून लिखाण नेटके करावे.

धाटी म्हणजे अक्षराची धाटणी किंवा वळण हे एकसारखेच ठेवावे. कथानक लिहिताना वाचकाला रंगत येईल अशी काव्याची अलंकारिक रचना हवी.


ज्याला जाणायचय तो आत्मा शब्दांमधे सांगता येत नाही. सांगायचा प्रयत्न केलाच तर तो अपूरा ठरतो. वेदांनी देखील त्याच्याविषयी 'नेति नेति'। असे उद्गार काढलेले आहेत.

आत्म्याविषयीच्या यथार्थ ज्ञानाशिवाय श्रोत्यांशी कोणीही काहीच बोलू नये.

समाजासाठी दीपस्तंभ असलेल्या महंताने तरी हे नक्की लक्षात ठेवावे.


महंतलक्षण समास.


🙏💐💐💐💐💐🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या