किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड -: अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशानुसार ‘स्वच्छ तीर्थ अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत २१ जानेवारीपर्यंत मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.आष्टी शहरातील गणपती मंदिर परिसर भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदीर परिसर स्वच्छ केला स्वच्छ तिर्थ अभियानामध्ये त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तालुक्यातील आष्टी शहरातील गणपती मंदिर परिसरात भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अजय दादा धोंडे यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ तीर्थ अभियानामध्ये आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह शनिवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वच्छ तिर्थ अभियान राबविले हातात झाडू घेऊन मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी सरपंच विष्णू दहिफळे, संजय मिसाळ, सदाशिव दिंडे,बाबूराव कदम,आदेश निमोणकर,प्रविण धोंडे, बाजीराव हजारे,उमेश शिंदे,आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या