गरुडझेप घेणार्या नेतृत्वाचा आज २० जानेवारी रोजी वाढदिवस.
किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड -: राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोना यांसारख्या संकटात ते जनतेच्या मदतीला धावून आले.
फुले शाहू आंबेडकरी विचारांची जाणीव उराशी बाळगणारा व शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्रिद वाक्याला धरून ते काम करीत आहेत.श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे जबाबदार अध्यक्षाचा पदभार स्विकारुन या शैक्षणिक संस्थेचा डोलारा सांभाळतानाच त्यांनी अनेक सर्व सामान्य विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा देऊन विद्यार्थी घडवले आहेत.त्याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित केले.आणि जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवले. ते ज्या विभागातुन सदस्य म्हणून निवडुन आले त्या विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. दिपावली सणामध्ये गरीब कुटुंबातील व्यक्तींना किराणा किटचे वाटप अशा अनेक गरजू व्यक्तींना ते कायमच मदत करत आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमदार सुरेश आण्णा धस,माजी आमदार भिमरावजी धोंडे साहेब,युवा नेते जयदत्त धस,जिल्हा परिषद सदस्य उध्दव दरेकर,सभापती रमजान तांबोळी, हेमंतशेट मेहेर,माजी सरपंच अनिल ढोबळे,संजय ढोबळे,सह सामाजिक, राजकिय, व्यापार, शैक्षणीक, पत्रकारीता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दि ल्या.
योगेशशेट भंडारी यांना चित्रा न्युज व पत्रकार किरण जावळे सर परिवारांकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...
0 टिप्पण्या