किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड-आष्टी तालुक्यातील चिंचाळा जि .प .प्रा. शाळेत शनिवार दिनांक 20.01.2024 रोजी बाल आनंद मेळावा आणि आठवडी बाजार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गंगाधर पोकळे ,सरपंच पंडित आण्णा पोकळे, अशोक पोकळे, डॉ गणेश पोकळे, जालूभाऊ पोकळे, आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते झाले.इयत्ता 7 वी च्या
विद्यार्थ्यांनी पाणीपुरी , भेळ, चहा,समोसे यांचे स्टॉल लावले होते तर इयत्ता 1 ली ते 7वी विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रीस ठेवला होता,ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला,विद्यार्थ्यांना बाजारात बसण्याचा ,विक्री करणे तसेच पैशाचा हिशोब हा अनुभव आला.सर्वात जास्त नफा मयुरी पोकळे या विद्यार्थिनी ने मिळवला. ज्या विद्यार्थ्यांचा भाजीपाला संपला त्यांनी इतरांकडून विकत घेऊन पुन्हा भाजीपाला विकला ,यातून व्यापार करण्याचा अनुभव आला शाळेतील श्रीम. हेमलता तरटे मॅडम (मुख्याध्यापक ),श्री दादासाहेब चव्हाण सर,श्री. दीपक म्हस्के सर,श्रीमती वर्षा गळगटे मॅडम,श्रीमती स्वाती खिलारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्वांच्या परिश्रमातून मेळावा यशस्वी झाला
0 टिप्पण्या