आत्मदहन इशाऱ्यानंतर पोलिसांनी केली धडक कारवाई
किसनीबाई सोन्याचे दागिने व पैसै परत मिळतील या न्यायाच्या प्रतीक्षेत
किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838
बीड-पेण येथील वरेडी कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या अशिक्षितपणाचा व भोळेपणाचा फायदा घेत पेणमधील पती-पत्नी सिकंदर व मनीषा नामक 'बंटी-बबली' जोडीने तिच्याजवळील ४० तोळे सोने व ५० हजारांची रोख रक्कम अशी एकूण १२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली होती. चार महिन्यांनंतर शुक्रवारी त्यांना अटक केली आहे.
याबाबतची तक्रार पेण पोलिस ठाण्यात ४ महिन्यांपूर्वी नोंदविण्यात आली होती. मात्र, चार महिने होऊनही त्यांना अटक न झाल्याने किसनीबाई कोळी यांनी २६ जानेवारीला पेण पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी सिकंदर थळे व त्याची पत्नी मनीषा यांना अटक केली आहे.
वरेडी गावात राहणाऱ्या किसनीबाई चंदर कोळी या मच्छी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. यश प्लाझा येथे राहणाऱ्या आरोपींची ओळख झाली होती. त्यांच्यात आई मुलांसारखे नाते निर्माण झाल्यानंतर गरज असल्पौ सांगून पैशांची व दागिन्यांची मागणी केली. महिलेने देण्यास नकार दिला असता, विश्वास देत ४० तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये घेतले. ज्वेलर्स तसेच खासगी फायनान्स व सहकारी पतसंस्था यांच्याकडे सोने गहाण ठेवून पैसे घेतले असल्याचे तक्रारदार किसनीबाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.
२६ जानेवारीरोजी पेण पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्या नंतर पोलिसांनी सिकंदर थळे व त्याची पत्नी मनीषा यांना अटक केली आहे. आता या जोडीला अटक झाल्याने फसवणूक झालेल्या किसनीबाई कोळी यांना आपले सोन्याचे दागिने व पैसै परत मिळतील या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
_________
पेण पोलीसांना आत्मदहनाचा इशारा दिलेली फिर्यादी वृध्द महिला किसनीबाई कोळी.
0 टिप्पण्या