Ticker

6/recent/ticker-posts

युवकाचे बॅगेची चैन उघडून रोख रक्कम लांबविली

• बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लाखनी परिसरातील घटना 

• अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी  येथील बँक शाखेतून मजूरांना मजुरीची रक्कम देण्याकरिता वडिलांचे खात्यातून ५०० रुपयाचे नोटांचे ४ बंडल एकूण २ लाख रुपये काढून महामार्गाचे पलीकडील बँक ऑफ इंडिया लाखनी शाखेत खाता उघडण्याचा फॉर्म देत असताना बॅगेतून २ बंडल एकूण १ लाख रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना सोमवार(ता.५) दुपारी १:१५ वाजता दरम्यान घडली. रज्जत खराबे याचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोराच्या शोधार्थ २ पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. वृत्त लिही पर्यंत चोराचा सुगावा लागला नव्हता. पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असला तरी खातेदरांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 
             फिर्यादी रज्जत खराबे(२७) रा. केसलवाडा/वाघ हा घरीच स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतो. त्यांचे घराचे बांधकाम केसलवाडा/फाटा येथे सुरू असल्याने घराचे बांधकाम करणाऱ्या मजुरांना मजुरीचे पैसे देण्याकरिता वडिलांचे नावाने बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लाखनी येथे त्यांचे खाते असल्यामुळे तेथून तो नेहमीच रक्कम काढत असतो. सोमवारी(ता.५) दुपारी १:१५ वाजता चे सुमारास फिर्यादी त्याचा मित्र सुभाष चेटूले सोबत बँक ऑफ महाराष्ट्र येथे धनादेश विड्रॉल करण्यासाठी गेले. बँक काउंटर वरून ५०० रुपयाच्या १०० नोटाचा १ बंडल असे एकूण ४ बंडल रुपये २ लाख त्याने आपल्या ताब्यात घेतले व बॅगेमध्ये ठवले. तथा बॅग पाठीमागे लटकवून बँकेचे गेट मधून बाहेर निघून महामार्गाचे पलीकडे असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा लाखनी येथे खाता उघडण्याचा फॉर्म घेऊन बँकेमध्ये टाकत असताना बॅग ची चैन खुली दिसली. त्यामुळे संशय येऊन बॅगेत ठेवलेल्या रोख रकमेचे बंडल पाहिले असता २ बंडल रुपये १ लाख दिसून आले नाही. त्यामुळे तो परत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जाऊन चोरीस गेलेल्या १ लाख रुपयाचा शोध घेतला. पण मिळून आले नाही. त्यामुळे बँक परिसरातून बॅगेतून कोणीतरी अज्ञात इसमाने १ लाख रुपयाची चोरी केल्याचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक ३२/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक  सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने तपास करीत आहेत. चोराचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, पोलिस हवालदार केशव नागोसे व महिला पोलिस हवालदार योगिता सिंगणजुडे यांचे पथकाने बँक शाखेत जाऊन सीसीटिव्ही फुटेज तपासणी केली. पण वृत्त लिही पर्यंत चोराचा सुगावा लागला नव्हता. या घटनेमुळे खातेदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या