🌞 दिन विशेष
इसवी सन २०२४ - ६ फेब्रुवारी
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. १७ माघ १९४५,
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : हेमंत
मास: पौष
पक्ष: कृष्ण
तिथी: एकादशी (१६.००) ~ द्वादशी
वार: मंगळवार
नक्षत्र : ज्येष्ठा (०७.३०) ~ मूळ
राशी: वृश्चिक (०७.३०) ~ धनु
*षटतिला एकादशी*
*संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा, त्र्यंबकेश्वर, नाशिक*.
*सयाजीराव गायकवाड पुण्यस्मरण*
*गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुण्यस्मरण*
१९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
१९३२: प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
१९५९: जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिले पेटंट घेतले
*जन्मदिवस*
१९१२: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन
१९१५: आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप
१९८३: क्रिकेटपटू श्रीशांत (सट्टेबाज)
मृत्यूदिन
१८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले
१९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू
१९३९: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे)
१९७६: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक
२००१: केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
२०२२: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर.
*।। दास-वाणी ।।*
प्रचीतिविण जें ज्ञान ।
तो अावघाचि अनुमान ।
तेथें कैचें परत्रसाधन ।
प्राणीयासी ।।
याकारणें मुख्य प्रत्यये ।
प्रचीतिविण कामा नये ।
उपायासारिखा अपाये ।
शाहाणे जाणती ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०७/१८-१९
प्रत्यक्ष अनुभूतीशिवाय जे ज्ञान ऐकले आणि सांगितले जाते ते निव्वळ शब्दज्ञान असते. असे अंदाजपंचे ज्ञान ही निव्वळ पोपटपंची आहे. साधकाला परत्र म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी या शब्दज्ञानाचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रत्यय म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हाच मुख्य विचार असला पाहिजे.
प्रचीतिशिवाय सफलता नाहीच.
प्रचीतिवीण शब्दज्ञान।
ते श्वानाचे वमन।
असे मानले जाते. अननुभवी शाब्दिक ज्ञान हा उपाय न होता अपायच होण्याची शक्यता अधिक. हे शहाणे जन नक्कीच जाणतात.
युगधर्मनिरूपण समास.
🙏💐💐💐💐💐🙏
0 टिप्पण्या